चंद्रपूर, दि. 20 : राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना अंतर्गत मंजूर असलेले मानधन त्यांच्या बँक खात्यावर अदा करण्यासाठी डीबीटी करण्यात येणार आहे. या करिता आधार व्हेरीफिकेशन (पडताळणी ) करणे आवश्यक आहे. आधार व्हेरीफिकेशन करण्यापूर्वी वृध्द कलावंत यांनी आधार क्रमांक सोबत मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करावे.
ज्या वृध्द कलावंत व साहित्यीकांचे आधार कार्ड हे मोबाईल क्रमांक व बँक खाते लिंक आहेत, त्यांनी आधार व्हेरीफिकेशनसाठी पंचायत समिती किंवा समाज कल्याण जि.प. चंद्रपूर येथे दिनांक 31 मे 2024 पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.
००००००