अमरावती ( प्रतिनिधी )
रामदेव बाबा सत्संग मंडळ व श्री शिवशंकर हनुमान मंदिर ट्रष्टच्या वतीने काँग्रेस नगर येथील पंचवटी प्रार्थना मंदिर येथे हभप श्री गोविंदराव फासाटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला.
समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड अध्यक्षस्थानी होते. सत्कारमूर्ती हभप श्री गोविंदराव फसाटे तर प्रमुख अतिथी समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,सिताराम खंडेलवाल,श्रीकृष्ण खंडेलवाल, सौ.रजनी आमले, रामरावजी घोडस्कर,ज्ञानेश्वर देशमुख,संजय तायवाडे,मुलचंद मंडले,राजेंद्रजी हाडोळे,नरेंद्र गणोरकर होते तर रामकुमार खैरे,शंकरराव आचरकाटे, सुधीर घुमटकर,दीपक आमले, आत्माराम झोडपे, वासुदेव वानखडे,राजेंद्र सिंह बघेल,रतन चौधरी,अशोक भिडेकर,सुरेश नारायण प्रसाद, छोटू ठाकूर, अभिजीत सुरजुसे, प्रेमा बिरेली,जयश्री जयस्वाल, डहाके ताई,कल्पना चितवार, दर्शन चंदेल,मीनाक्षी चित्रवार, दत्ता कहाळे, श्रीमती कहाळे ताई, सिद्धी कहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या सर्वांच्या हस्ते व विविध संघटनांच्या वतीने हभप श्री गोविंदराव फसाटे यांचे शॉल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तकं देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
बॉक्स
सत्संगातून माणूस घडविला जातो .
-प्रा.श्रीकृष्णा बनसोड
अध्यक्षीय भाषणातून समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी,” जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून हभप श्री फसाटे जीवनात कार्य करीत आहेत कारण यातच जीवनाची खरी कृतार्तथा आहे.सत्संगातून माणूस घडविला जातो.प्रत्येक धर्म मानवता शिकवितो.इतरांवर प्रेम करायला शिकवतो.हभप श्री फसाटे अध्यात्मासोबतच सत्यशोधकीय तत्त्वज्ञान सांगून जनप्रबोधन करतात.” असे विचार व्यक्त केले.
प्रमुख अतिथी लेखक-कवी- वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी ,” हभप श्री गोविंदराव फासाटे आपल्या वाणीतून समाजजागृती करून समाजाला व्यसनमुक्त करण्याचा प्रयास करतात. समाजोन्नतीसाठी आज अशा व्यसनमुक्त समाजाची गरज आहे.प्रत्येक मानव समान समजून माणसाने माणसाची सेवा करून त्यांना दुःखमुक्त करण्यामध्ये जो आनंद मानतो तोच खरा माणूस असे मानवतावादी तत्त्वज्ञान सांगून ते समाजप्रबोधन करतात.” असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक व स्त्री पुरुष यांचा सत्कार हभप श्री गोविदराव फसाटे यांनी केला.
सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध महासंघ, उपेक्षित समाज महासंघ,कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,वऱ्हाड विकास परिवार व रामदेव बाबा ट्रस्ट इत्यादी संघटनांचे अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
श्री नरेंद्र गणोरकर यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.