चंद्रपूर -प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा , अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,विधानपरिषद महाराष्ट्र राज्य यांना नुकतेच दिले असून प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांना राज्य विधिमंडळ अधिवेशनात प्राधान्याने मांडण्याचे आश्वासन आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले .
निवेदनात संगणक एम एस सी आय टी चा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा .१०० पटास एक मुख्याध्यापक देण्यात यावा,सर्व विषय शिक्षकांना समान वेतनश्रेणी देण्यात यावी ,चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचे नियमित वेतन करण्यात यावे ,सर्व पदोन्नत्या तात्काळ करून रिक्त पदे भरण्यात यावी . याकरिता पुढील अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावे असे अनेक विषय चर्चिण्यात आले .शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सूतोवाच केले .याप्रसंगी पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे मार्गदर्शक दीपक वऱ्हेकर,जिल्हा सरचिटणीस सुरेश गीलोरकर, कार्यकारी सचिव दिवाकर वाघे , राज्यनेते विजय भोगेकर , रवी झाडे आदी उपस्थित होते .
Home चंद्रपूर प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अधिवेशनात मांडाव्या-शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना पुरोगामीचे निवेदन