रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर -सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना पवित्र पोर्टल ची भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर भारमुक्त करण्याचे शासनाचे निर्देश होते पण लगेच लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागल्याने आंतरजिल्हा बदली शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले नाही. शासनाने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करुन त्यांना पदस्थापना देण्याचे नियोजन केले आहे व काही जिल्हा परिषद ने पदस्थापना केलेली आहे. आपल्या गावापासून नोकरीसाठी कोसो दूर आलेले शिक्षक कुटूंबापासून बरीच वर्ष विभक्त राहिले आहेत. शासनाच्या ऑनलाइन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने त्यांची गावाकडे नोकरी करण्याची स्वप्न पूर्ण होत आहे पण आचारसंहितेच्या अडवणूकीने काही काळासाठी स्वप्न धुसर झालेली आहेत. आपल्या गावाकडे बदली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असताना आचार संहितेने खोडा घातल्यामुळे भारमुक्त होण्यास ४ जुन २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना त्वरीत भारमुक्त करुन त्यांना स्वजिल्ह्यात जाण्याची व पदस्थापना घेण्याची संधी द्यावी अशी मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे एका निवेदनाद्वारे व चर्चद्वारे केली आहे. —
– आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना बरीच वर्ष आईवडीलांपासून दूर राहावे लागले. आंतरजिल्हा बदली ने आता त्यांना आपल्या कुटुंबात राहायला जाण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सांगली चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ९ मे २०२४ ला आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त केल्याचे आदेश निर्गमीत केले आहे. बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मुलांची एडमिशन घेणे व कुटुंब स्थावर करणे यासाठी बराच अवधी लागणार आहे त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली झालेल्या ४७ शिक्षकांना त्यांची समस्या लक्षात घेऊन १५ मे २०२४ पर्यंत त्वरीत भारमुक्त करावे अशी संघटनेची मागणी आहे.
*किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष म. पु. प्रा. शिक्षक समिती चंद्रपूर*