Home यवतमाळ ट्रायबल आदिवासी योजने अंतर्गत झालेल्या पार्डी (चु) सिमेंट रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था ...

ट्रायबल आदिवासी योजने अंतर्गत झालेल्या पार्डी (चु) सिमेंट रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था [चौकशी व दुरुस्ती त्वरित न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा]

206

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड:- (दि.11मे) पार्डी (चू) येथे ट्रायबल आदिवासी योजनेअंतर्गत झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने अल्पावधीतच त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे त्वरित चौकशी करून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पार्डी (चू) येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी बांधकाम विभाग यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड मार्फत आज दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पार्डी (चु) येथे आदिवासी ट्रायबल झालेल्या योजनेअंतर्गत झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम हे दर्जाहीन झाल्याबाबत दिनांक २९/०१/२०२४ व २०/०२/२०२४ रोजी अर्ज सादर करून सुद्धा आज पर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही. सदर काम इस्टिमेट प्रमाणे करण्यात आलेले नाही त्यामुळे हा रस्ता अल्पावधीतच नागरिकांना वापरण्यायोग्य राहिलेला नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

या बाबीची त्वरित चौकशी करण्यात यावी तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आम्ही उपोषणास बसण्यास तयार असल्याचे दिनांक ८/०५/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी विजय मिराशे, अविनाश मिराशे, होलघरे, अंकुश बरवा, राजेश बराटे, गजानन बोडके लक्ष्मण मिराशे प्रकाश पडघणे लहू मिराशे मधुकर सिताराम राठोड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here