Home महाराष्ट्र मा.श्री. मदनराव आवाडे यांना संघर्ष नायक पुरस्कार प्रदान.

मा.श्री. मदनराव आवाडे यांना संघर्ष नायक पुरस्कार प्रदान.

187

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515 गंगाखेड:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द मुंबई येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे निर्माते , क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचे जनक लोकनेते क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले यांची 71 व्या जयंती निमित्त क्रांतीज्योती कुसुमताई गोपले व मातंग समाजाचे नेते सुदाम आवाडे यांच्या हस्ते मा‌‌. श्री. मदनराव आवाडे यांना संघर्ष नायक पुरस्कार देण्यात आला. त्याप्रसंगी अखिल भारतीय मातंग सेनेचे अध्यक्ष योगेश शिंदे , भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक राय , शिवसेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे , डॉ . बाबासाहेब गोपले सेना परभणी जिल्हा कार्याध्यक्ष राजेश सगट ज्ञानदेव साठे, श्रावण नाटकर सर , सुरेश साळवे, गुलाब साठे, देवेंद्र खलसे, वसंत साळवे असे अनेक सामाजिक चळवळीतील नेते उपस्थित होते..शोभा लोंढे, सविता दासरे , आशा शिंदे , दत्तात्रय आवाडे या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here