रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर – जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या आदिवासी व एकस्तरवेतनश्रेणी वेतनिश्चिती ची थकबाकी व १५ % प्रोत्साहन भत्ता थकबाकी रक्कमेतून ज्या शिक्षकांनी संगणक अर्हता उत्तीर्ण केलेली नाही अशांच्या थकबाकीतून अति प्रदान वसुली करण्यात यावी असा चुकीचा आदेश मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर ने निर्गमित केलेला आहे . त्यामुळे ३१ मार्च २०२४ ला अर्थकारणाच्या माध्यमातून काही मोजक्या पंचायत समितीतील शिक्षकांचे प्रोत्साहन भत्ता थकबाकी व एकस्तर वेतनश्रेणी वेतनिश्चिती ची थकबाकी काढण्यात आली, मात्र संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबबीखाली अति प्रदान वसुली करण्यात आली . अशी चुकीची कार्यवाही लेखा व वित्त विभागाकडून करण्यात आलेली आहे. पंचायत समिती मूल चे शिक्षकांचे प्रोत्साहन भत्ता थकबाकी व एकस्तरवेतनश्रेणी वेतननिश्चिती ची थकबाकी बील तपासतांना मुद्दा क्र.६ मध्ये संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबब उल्लेखीत केलेली आहे व बील परत केले आहे. लेखा व वित्त विभागाचे लेखाधिकारी अपु-या ज्ञानाने चुकीचे निर्णय घेऊन शिक्षण विभागाला नाहक त्रास देण्याची कार्यवाही करीत असल्याचा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचा आरोप आहे. या संबंधी संघटनेने माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत माहिती मागितली असता व अधिका-यांशी केलेल्या चर्चेनुसार लेखा व वित्त विभागाकडून संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबबीखाली अति प्रदान वसुली करण्यात यावी असे कोणतेही पत्र निर्गमीत केलेले नाही अशी कबुली दिलेली आहे पण सर्व पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी हेच संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबबीखाली अति प्रदान वसुली करीत आहेत असा जिल्हा परिषद लेखा व वित्त विभागाकडून सांगण्यात आले आहे व माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे. संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबबीखाली अति प्रदान वसुली न करता स्थगिती दिलेली असल्याचे अनेक शासन निर्णय निर्गमित झालेले आहे.सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय दि.२७ नोव्हेंबर २०२० च्या नुसार संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबबीखाली अति प्रदान वसुली न करता स्थगिती दिली आहे. आजमितीस शिक्षकांनी संगणक अर्हता प्रमाण पत्र सादर करणे अनिवार्य आहे असे पत्र निर्गमीत केलेले नाही. परिणामी शिक्षकांनी संगणक अर्हता या बाबीकडे विशेष लक्ष घातलेले नाही. संगणक अर्हता प्रमाणपत्र ही बाब कार्यालयीन व प्रशासकीय मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी यांचेशी निगडीत आहे. अध्यापनाचे काम करणारे शिक्षकांशी संगणक अर्हता अनिवार्य नसावी असा कयास शिक्षकांचा आहे अशी संघटनेची धारणा आहे. करिता यापुढे संगणक अर्हता उत्तीर्ण नसल्याचे सबबीखाली अति प्रदान वसुली करण्यात येवू नये व ज्या कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांची अति प्रदान वसुली केलेली आहे त्यांची रक्कम परत करण्यात यावी अशी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी आहे.