पुणे:-
पुणे चैत्र पालवी काव्य महोत्सव ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या पुढाकाराने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी भव्य दिव्य खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले तसेच यावर्षीच्या कवीच्या कवितासंग्रहास पुरस्कार देवून गौरविण्यात आले
काव्य महोत्सवाचे उद्घाटन प्रा
प्रतिमा काळे कविसंमेलन अध्यक्ष संजय धनगव्हाळ प्रमुख पाहुणे धनंजय इंगळे लक्ष्मण शिंदे ॲड नंदिनी शहासने किशोर टिळेकर निवेदक रानकवी जगदीप वनशिव हे हजर होते.
पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा मनोगते व कविसंमेलनात मयूरी खानविलकर स्वरूप मराठे वाय के शेख बा. ह. मगदूम प्रतिमा गजरमल निरंजन ठणठतणकर शिवाजी थिटे छगन वाघचौरे जनाबापू पुणेकर प्रा.सूर्यकांत नामगुडे नानाभाऊ माळी पुष्पा साळवे अर्चना चव्हाण आनंदा भारमल तारा चौधरी मेहमूदा शेख तानाजी शिंदे सृष्टी कोल्हे दिनेश कांबळे बाबा ठाकूर क्रांती पाटील विजय सातपुते दीपाराणी गोसावी सीताराम नरके विलास कुंभार भारत कवित्के प्रसन्नकुमार धुमाळ पुजा माळी दिनेश गायकवाड रूपाली अवचरे रेवती सांळुखे बाळकृष्ण बाचल दीपिका कटरे कविता तळेकर अशा सत्तर कवींनी आपला सहभाग नोंदविला सर्व मान्यवर कवींना गुलाबपुष्प सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ प्रा.श्रीपाल सबनीस ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक तसेच बबन पोतदार कथाकार साहित्यिक यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा करण्यात आला असून त्याप्रसंगी सबनीस म्हणाले चैत्र पालवी काव्य महोत्सवात संस्कृती नांदते आहे कवीचे वतन आहे साहित्य तरल मनाचे कवी अंगभूत सौंदर्य नाद लय कल्पना शक्ती मानवता संस्कृती संस्कार मूल्यमापन केले पाहिजे माणसे वाचली पाहिजेत मानवतेचा मंत्र हक्क कळलाच पाहिजेच सूत्रसंचालन करणारे रानकवी यांचे नाव मला माहित नसले स्मशान ही कविता तरी काळजात कोरलेला माणूस म्हणजे जगदीप वनशिव जगावेगळी छक्कड सादर करून अलंकार प्रतिके शृंगारिक रचना सादर केली मी अशा अवलियास सलाम करतो असे प्रतिपादन केले.
बबन पोतदार यांनी निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांना शब्द कोट्यधीश उपाधी बहाल केली असून आयोजक चंद्रकांत जोगदंड यांच्या कार्याची प्रशंसा केली काळजातला कवी अशी स्तुती सुमने उधळली तसेच जोगदंड यांचे शालेय गुरुवर्य हनुमंत धालगडे म्हणाले माझा आदर्श विद्यार्थी मृदुल स्वभावाचा गुणसंपन्न लाडका शिष्य चंद्रकांत जोगदंड हे आहेत .
व्यंकटराव वाघमोडे सूर्यकांत तिवडे मान्यवरांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या निमंत्रित कविवर्य बाळासाहेब गिरी देवेंद्र गावंडे लक्ष्मण शिंदे किशोर टिळेकर ऋषिकेश भोसले अशा अनेक कवींच्या कविता सादर झाल्या हास्य दिनाच्या काव्य रसात टाळ्यांचा गजर करीत आनंदित वातावरणात मने प्रफुल्लित करत
कवी गायक आनंद गायकवाड यांनी आभार मानले अशा प्रकारे चैत्र पालवी काव्य महोत्सव पुणे येथील एस. एम.जोशी फाऊंडेशनाच्या सभागृहात थाटामाटात पार पडला.