Home चंद्रपूर अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त-सुरेश डांगे सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि...

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त-सुरेश डांगे सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार

185

 

चिमूर – भावी पिढी व समाज घडविण्याकरिता पूर्वी शिक्षकांना ज्ञानदानासाठी भरपूर वेळ मिळत होता.मात्र आता नवनवीन शासकीय धोरणांमुळे अशैक्षणिक, ऑनलाईन कामे वाढलेली आहेत. यामुळे शिक्षकी पेशा कठीण झाला आहे. रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांनी अशाही परिस्थितीत शाळा, विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले ते निश्चितच गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे यांनी केले.

चिमूर पंचायत समिती अंतर्गत उरकुडपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रावन शेरकुरे आणि सहाय्यक शिक्षक प्रमोद मायकुरकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शिक्षक भारती चिमूर तालुकाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामीण पतसंस्थेच्या सभागृहात सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी सुरेश डांगे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परशुराम नन्नावरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ.महेश खानेकर, केंद्रप्रमुख रवींद्र पिसे, सामाजिक कार्यकर्ते नारायण कांबळे,अशोक वैद्य,शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी, विशेष शाळा जिल्हा सचिव रामदास कामडी,विनोद गेडाम,डाकेश्वर कामडी, क्रिष्णा बावणे,अलका शेरकुरे, सुवर्णा मायकुरकर आदी उपस्थित होते.प्रमुख अतिथी डॉ.महेश खानेकर, नारायण कांबळे,रामदास कामडी, अशोक वैद्य, नंदकिशोर शेरकी, रवींद्र पिसे, नरेश पिल्लेवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण परशुराम नन्नावरे यांनी केले.सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणी जागृत केल्या. सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण कार्यरत राहणार असल्याचे सत्कारमूर्तीनी यावेळी आश्वस्त केले.

कवी प्रकाश कोडापे यांनी शेरकुरे आणि मायकुरकर यांच्या जीवनावर स्वरचित कविता सादर केली. केंद्रप्रमुख रवींद्र पिसे यांचा बढतीबद्दल शिक्षक भारतीतर्फे सत्कार करण्यात आला.उपस्थित पाहुण्यांचे हस्ते सन्मानचिन्ह, शाल, भेटवस्तू, पुस्तक देऊन रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला शिक्षक भारती सदस्य, पत्रकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. समारंभाचे संचालन तालुका सचिव कैलाश बोरकर यांनी केले. प्रास्ताविक तालुका कार्याध्यक्ष संजय सर यांनी केले. आभार बंडू नन्नावरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here