धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील
धरणगाव — येथील बोरगाव बु. येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा.पं.सदस्य व अभ्यासू व्यक्तिमत्त्व भैय्या मराठे यांनी केले, यावेळी मराठे सरांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विचार प्रबोधनाचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रम प्रसंगी आलेल्या अतिथी मान्यवरांचा परिचय व स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्याध्यापक मनोज ठाकरे सरांनी बाबासाहेबांच्या अफाट वाचनाबद्दल ची महती वर्णन करत महामानवाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष तथा व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची महती सांगितली. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू तुकोबाराय यांच्या कार्याबद्दल बोलतांना सांगितले की, हे सर्व महापुरुष जातीने नव्हे तर विचारांनी एक होते. महापुरुषांना डोक्यावर नव्हे तर डोक्यात घेण्याची गरज आहे, असे मत व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी मांडले. कार्यक्रमात लहान लेकरांनी देखील बाबासाहेबांच्या बद्दल मनोगत व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच महेश मराठे, मुख्याध्यापक मनोज ठाकरे, ग्रा.स.किशोर शेडगे, बापू पवार, गोकुळ पाटील, भैय्या मराठे, दिपक पाटील, किशोर नांदेड, पिंटू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेबराव सूर्यवंशी, गौतम सोनवणे, रविंद्र सोनवणे, राजू सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी महिला, पुरुष, युवक व आबालवृद्ध व बालगोपाल यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भैय्या मराठे सर यांनी केले.