Home चंद्रपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेचर फाउंडेशन अभ्यासिका मध्ये साजरी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेचर फाउंडेशन अभ्यासिका मध्ये साजरी

60

 

नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.14 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मिथुन शंभळकर सर.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अडेगाव (देश) ग्रामपंचायत च्या सरपंच करिष्माताई गजभीये आणि सोबतच निशाताई चौधरी निकील मोडक यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

भीमजयंती म्हणजे हजारो वर्षाचा अंधकार संपवणारी पहाट..!! उत्सव समतेचा उत्सव तुमच्या आमच्या जगण्याचा..!!

माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं, आज मी खूप वर आलो आहे, माझ्या भीमानं मला उंचावर नेलं आहे

कार्यक्रमाची सुरुवात ही भिमगीताच्या डान्स वर झाली
त्यात सहभागी झालेले पूनम गजभे आणि आचल गजभिये

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत नन्नवरे आणि प्रास्ताविक वैभव वाकडे यांनी केले.प्रास्ताविक सागत असताना त्यांनी या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय करून गेले आणि आपल्यासाठी काय करायला सागितले. आणि आपण त्यांच्या विचारांवर चालत अहो का त्यांचे विचार जर आपण आत्मसात केले तर आपल्या जीवनाचा नक्कीच उद्धार होईल असे त्या प्रस्ताविकेमध्ये सांगण्यात आले

कार्यक्रमाला लाभलेले मिथुन शभरकर सर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून खूप मोलांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात ते म्हणले की आपण जर त्यांच्या विचारावर चालत गेलो तर आपण कधीच कुठ हार माननार नाही. कारण आजचे युग स्पर्धेची युग आहे त्यामुळे स्पर्धा ही जिकडे तिकडेच वाढत चालली आहे पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता सोबत ज्या महामानवाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, माणुसकीचा मार्ग दिला, शिक्षण घेण्याचा अधिकार तिला, माणूस म्हणून समाजात वावरण्याचा अधिकार दिला, मोफत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून ठेवल्या. आणि सोबत त्यांचे काही विचार त्यांचे मार्गदर्शन केले शेवटी त्यांचे विचार घ्या हे सांगून गेले.
तसेच अडेगाव ग्रामपंचायत च्या सरपंच करिष्माताई गजभिये यांनी पण मार्गदर्शन केले त्यांनी प्रतिमेला अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर बद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले आणि त्यांनी शेवट हा भिमगीत म्हणून केले.

कार्यक्रमाचे शेवट हे आभारप्रदर्शन प्रज्वल खडसंग यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here