Home Breaking News गुरु-शिष्य जन्मोत्सवनिमित्त कापडणे गावात वैचारिक प्रबोधन शिवरायांचे स्वराज्य खऱ्या अर्थाने बहुजनांचं;...

गुरु-शिष्य जन्मोत्सवनिमित्त कापडणे गावात वैचारिक प्रबोधन शिवरायांचे स्वराज्य खऱ्या अर्थाने बहुजनांचं; व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

76

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव: क्रांतीसूर्य तात्यासाहेब फुले व प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या गुरु शिष्यांचा जन्मोत्सवानिमीत्त कापडणे गावात सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी व्याख्याते लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. दुसरे पुष्प गुंफत असताना लक्ष्मणराव पाटील यांनी व्याख्यानात सांगितले की, आम्हाला शिवराय फक्त अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारे सांगितले जातात परंतु महाराजांनी अफजलखानला मारण्यासाठी जे वाघनखे वापरली तो बनवून देणारा रुस्तम ए जमान मात्र लपवला जातो. महाराजांनी जर १०० लढाया लढल्या असतील त्याच्यापैकी ७० लढाया स्वकीयांशी झाल्याचे कोणीच सांगत नाही, म्हणून हिंदू मुस्लिम द्वेष पसरविण्यापेक्षा छत्रपतींचं कार्य प्रामाणिक आणि स्पष्ट मांडणे गरजेचं आहे. म्हणूनच छत्रपती शिवरायांचे स्वराज्य खऱ्या अर्थानं बहुजनांचे होते. यांसह सर्व महापुरुषांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, वंदना भामरे, दिलीप साळवे, शोभाताई चव्हाण, कुंदन खरात, अब्दुल रहमान, चंद्रमणी वाघ, ॲड. विलास भामरे, दिलीप बोरसे, बाबुलाल बोरसे, पत्रकार जिजाबराव माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ, भूषण भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. भीम गर्जना मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ कापडणे आयोजित भीम महोत्सव २०२४ या तीन दिवशीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिवसभर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सत्यशोधक विद्यार्थी मंच मार्फत आयोजित विद्रोही शाहिरी जलसा देखील आयोजित करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोहर भामरे, बापूराव बागुल, जितेंद्र भामरे, सचिन भामरे, महेंद्र भामरे, संतोष भामरे, विनोद भामरे, भूषण ब्राह्मणे, संदीप ब्राह्मणे, मधुकर भामरे, विनोद मोरे व समाजातील जेष्ठ व युवकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here