Home Breaking News धरणगाव विकास मंच तर्फे शहरातील विविध समस्या बाबत नगर परिषदेला निवेदन

धरणगाव विकास मंच तर्फे शहरातील विविध समस्या बाबत नगर परिषदेला निवेदन

58

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : येथील धरणगाव विकास मंचच्या वतीने शहरातील असंख्य विविध समस्यांचे निवारण तातडीने करावे, याबाबतीत नगरपरिषदेचे कार्या. अधीक्षक पारधी साहेब यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात.. १ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना मोकळा श्वास मिळेल अशी व्यवस्था करावी. २ गावातील विविध भागातील हायमास व स्ट्रीट लाइट सुरु करणे. ३ गावातील गटारीची स्वच्छता नळाच्या पाण्याच्या नियोजनानुसार करावे. ४ बालाजी मंदिर ते भोईवाडा रस्ता दुरुस्त करणे. ५ बालाजी मंदिर जवळील झोपडपट्टी भागातील सार्वजनिक स्वच्छता गृहांचा मैला गटारातून वाहतो, त्याचे योग्य नियोजन करणे. ६ सार्वजनिक विहिरीची स्वच्छता करून त्यांना पुनर्जिवित करणे. ७) मोठा माळी वाडा भागातील संपूर्ण पथदिवे गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे.लवकर दुरुस्त कऱण्यात यावे. ८ तेली तलावात येणाऱ्या कॉलनी भागातील अशुद्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे. ९ कुंभारवाडा, भडंगपुरा, सत्यनारायण चौक, मोठा माळी वाडा तसेच गावातील विविध भागात तुटलेल्या ढाप्यांचे बांधकाम करणे. १० तेली तलाव व बेबी तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी, जेणेकरून तलावांचे खोलीकरण होऊन हातपंप, बोरिंग यांना निश्चितच फायदा होईल. ११ गावातील कोणत्या प्रभागात नळांना पाणी पुरवठा नेमके कधी करण्यात येईल, याबाबतची माहिती जनतेला द्यावी. १२ दादाजी नगर भागात बालाजी मंदिर प्रवेशद्वार जवळ लिकेज चे पाणी निरंतर वाहत असते, त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी डबके साचलेले असल्याने लीकेज बंद करण्याची कार्यवाही व्हावी. १३ संपूर्ण शहरात मच्छर, डास यांचे अधिक प्रमाण वाढले असून शहरात फवारणी करावी. १४ बडगुजर गल्लीतील सुनील बडगुजर यांच्या घराजवळ पाईप लाईन फुटल्याने भर रस्त्यात भला मोठा खड्डा बुजविण्यात यावा, इ.समस्या मांडण्यात आल्या.
मागील निवेदनात मांडलेल्या समस्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल मयूर बागुल यांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले. आजच्या निवेदनात दिलेल्या समस्यांची उकल त्वरीत करण्यात यावी अशी विनंती जेष्ठ नागरिक सुधाकर विसावे यांनी केली. जीवनावश्यक गोष्टी प्रशासनाने प्राध्यान्यक्रमाने पुरवाव्यात एवढी माफक अपेक्षा नागरिकांची असते, असे मत नदीम काझी यांनी मांडले.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात वरील समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा धरणगाव विकास मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य धरणगावकर नागरिक करीत आहेत. निवेदन सादर करतांना आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, राहुल जैन, विजयकुमार शुक्ला, ॲड.व्ही.एस.भोलाणे, पी. डी. पाटील, सुधाकर मोरे, भरत शिरसाठ, स्वप्निल जैन, योगेश मांडगे, करीम खान, प्रफुल पवार, सचिन भागवत, किरण सोनवणे, भूषण भागवत, कालिदास बाविस्कर, भागवत आबा चौधरी, दिनेश भदाणे, साहेबराव महाजन, राजेंद्र चौधरी, इकबाल खान, गोरख देशमुख, अनिल लोहार, बिपिन जाधव, परमेश्वर महाजन, मयूर भामरे, महेंद्र तायडे, सतीश आखाडे, किरण माळी, धर्मराज मोरे, अविनाश बाविस्कर, विजय सोनवणे यांसह शहरातील सजग नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here