Home चंद्रपूर काँग्रेस व बीजेपी एकच नाण्याच्या दोन बाजू: प्रा.योगेश गोन्नाडे बसपा उमेदवार

काँग्रेस व बीजेपी एकच नाण्याच्या दोन बाजू: प्रा.योगेश गोन्नाडे बसपा उमेदवार

89

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड :- बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा. योगेश गोन्नाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली -चिमूर क्षेत्रात भाजपा व कांग्रेस यांनी काय काम केले याचा लेखाजोखा जनतेसामोर मांडावा असे पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.
प्रा. योगेश गोन्नाडे हे नागभीड येथील रहिवासी असून ते बसपाचे उमेदवार आहेत. योगेश गोन्नाडे हे अन्याय ग्रस्त आदिवासी, ओबीसी समाजाचे पुरसकर्ते असल्याने त्यांचा चिमूर, ब्रम्हपुरी मतदार संगात वाढता प्रभाव दिसून येत आहे. गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र हा अनुसूचित जमाती करिता राखीव असून यात 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या आधी योगेश गोन्नाडे हे शिवसेनेत होते.शिवसेनेत असतानी तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा विकास यंत्रणा तथा जिल्हा दक्षता समितीवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच नागपूर महानगर पालिकेवर दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यापूर्वी शिवसेनेकडून उमेदवारी साठी अनेकदा अर्ज सादर केले होते पण 25 वर्षाच्या कालावधीत पक्षाने दुर्लक्षित केल्यामुळे, अन्याय ग्रस्त आदिवासी व ओबीसी वर्गाची समस्या सोडविण्यासाठी बहुजन समाज पार्टी कडून उमेदवारी मिळविली आहे. अन्यायग्रस्त आदिवासी व ओबीसी यांना घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवण्याचा काँग्रेस व बीजेपीच्या प्रस्थापित सरकारने प्रयत्न चालवीला आहे. प्रस्थापिताचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी बसपा कडून उमेदवारी मिळविलेली आहे. अन्यायग्रस आदिवासी व ओबीसी यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे. या मतदार संघांचे खासदार अशोक नेते यांनी दहा वर्षात काय केले असा प्रश्न त्यांनी केला. दहा वर्षाचा लेखाजोखा खासदार अशोक नेते यांनी जनतेसमोर ठेवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस व बीजेपी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असेही ते म्हणाले. आपल्या देशातील बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे की जो अदानी, अंबानी सारख्या उद्योगपती कडून निवडणूक रोखे घेत नाही. त्यामुळे जनतेला पर्याय म्हणून व बहुजनांचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी योगेश गोन्नाडे यांना बहुमताने निवडून द्यावे असे आव्हान पत्रकार परिषदेतून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here