*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा.9075686100*
म्हसवड : अग्रणी सोशल फौंडेशन विटा जि.सांगली प्रणित इंडियन सेक्युलर सोसायटीच्या वतीने
रमजान ईद निमित्त राज्यव्यापी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
समाजात समता, सद्भावना, माणुसकी व्दिगुणित व्हावी.शांती , बंधुभाव वाढावा यासाठी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये
मा. अझर मणेर वडगाव हवेली ता.कराड जि.सातारा यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर न्यु इंग्लिश स्कूल धावडवाडी ता.जत येथील मुस्कान सुलतान सोनीकर यांनी व्दितीय व आलिशा राजुद्दीन सोनीकर रा.प्रतापूर ता.जत हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या निबंध स्पर्धेमध्ये
भारतीयसंविधान,धर्मनिरपेक्षता,राष्ट्रीय एकात्मता,विद्रोही संत कबीर,स्वातंत्र्यसेनानी मौलाना आझाद,भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम
या विषयावर राज्याभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यासाठी अग्रणी संस्थेचे संचालक
अय्याजभाई शिकलगार,
रियाजभाई शिकलगार,
आयेशादिदी सोनीकर,
सद्दाम मुजावर,अॅड.जस्मीन शेख,अॅड.अमीर मणेर,सलीम शिकलगार,आस्मा मणेर,तस्मिया मुलाणी,यास्मीन पिरजादे,शकील काझी, मुमताज मुलाणी,जस्मीन शिकलगार आदिंचे सहकार्य लाभले.