Home यवतमाळ नगरपरिषद हद्दीतील मालमत्तेवर वाढीव कर रद्द करून जुनेच कर कायम ठेवा –...

नगरपरिषद हद्दीतील मालमत्तेवर वाढीव कर रद्द करून जुनेच कर कायम ठेवा – विदर्भ मराठवाडा विकास आघाडी

76

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर( उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड (दि.८ एप्रिल) आपण शहरातील मालमत्ता धारकांना सन २०२४ – २५ ते २७-२८ महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिकीय नागरी अधिनियम १९६५ चे कलम १९ अन्वये कर आकारणीची नोटीस दिलेले आहेत.
मालमत्ता धारकांना आकारण्यात आली चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन प्रतिवर्ष आकारणी नव्याने व सुधारित जी करण्यात आली ती खालील कारणास्तव चुकीची अवास्तव्य अनाधिकाराची व बेकायदेशीर असल्याने प्रस्तावित कर आकारणी रद्द करण्यात येऊन जुने चक्कर कायम ठेवण्यात यावे.

अशा मागणीचे निवेदन विदर्भ मराठवाडा विकास आघाडी चे अध्यक्ष ॲड.संतोष जैन, सचिव साजिदउल्ला सनाउल्ला जागीरदार यांनी आपल्या पक्षाच्या वतीने उमरखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

अपिल/निवेदनाची कारणे :-
क) मालमत्तेचे काढण्यात आलेले वार्षिक भाडे हे संपुर्णतः चुकीच्या पद्धतीने अवास्तव व चुकीचे गृहीत धरण्यात आलेले आहे व त्या आधारे केलेली कर आकारणी ही अवास्तव, चुकीची व बेकायदेशीर आहे.

ख) नगर परिषद मार्फत शहरात ज्या सुविधा पुरविण्यात येतात त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असुन कुचकामी आहेत.

ग) शहरात मागील अनेक वर्षापासुन नगर परिषदेमार्फत कुठेही वृक्ष लावण्यात आलेले नाहीत. याउलट उमरखेड शहरात सामाजिक कार्य करणारी वृक्ष संवर्धन समिती ही वृक्ष लावुन ते जोपासण्याचे काम करते व त्याकरीता शहरातील विविध लोक आर्थिक मदत करतात. अशा परिस्थितीत नगर परिषदेमार्फत आकारण्यात आलेला वृक्षकर हा संपुर्ण अवास्तव, चुकीचा, अनाधिकाराचा व बेकायदेशीर असल्याने पुर्णपणे वृक्षकर रद्द करण्याची कृपा करावी.

घ) नगर परिषद संचलीत शाळेत शैक्षणिक दर्जा उच्च प्रतीचा नसल्याने शहरातील बहुतांश विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पुर्ण फिसचा भरणा करुन शिक्षण घेत असल्याने तसेच गरीब विद्यार्थ्यांना आर.टी.ई. खाली मोफत प्रवेश चांगल्या शाळेत मिळत असल्याने आपणामार्फत आकारलेला म. शिक्षण कर हा देखील अवास्तव, चुकीचा, अनाधिकाराचा व बेकायदेशीर असल्याने पुर्णपणे म. शिक्षण कर रद्द करण्याची कृपा करावी.

च) नगर परिषद मार्फत एकमेव अग्निशमन वाहन आहे. क्वचित प्रसंगी आग लागल्यास, फोन केल्यास नगर परिषदेतील दुरध्वनी हा एकतर बंद असतो किंवा लागला तर त्याला प्रतिसाद मिळत नाही आणि उचलण्यात आला तर चालक हजर नाहीत असे बेजबाबदार उत्तर देण्यात येते. एवढेच नव्हे तर सदरचे वाहन ज्या मालमत्ता धारकाचे घरी अग्निशमन करण्यासाठी जावुन अग्निशम करते त्यांना परत स्वतंत्र व वेगळे बिल नगर परिषदेमार्फत पाठविण्यात येते. त्यामुळे अग्निशमन कराच्या अनुषंगाने करण्यात आलेली प्रक्रिया अवास्तव, चुकीचा, अनाधिकाराचा व बेकायदेशीर असल्याने पुर्णपणे अग्निशमन कर रद्द करण्याची कृपा करावी.

यावेळी विदर्भ मराठवाडा विकास आघाडीचे उपाध्यक्ष खान कलीमउल्ला इनायतउल्ला, कोषाध्यक्ष ॲड. बाळासाहेब नाईक, सदस्य सुभाष दिवेकर, ॲड. नारायण इंगळे,भगवान शिंदे, उत्तम अनखुळे, मुकेश चक्करवार इत्यादी इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here