Home महाराष्ट्र “दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण” संदर्भाने मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न

“दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण” संदर्भाने मुख्याध्यापकांची आढावा बैठक संपन्न

103

 

 

(प्रतिनिधी-सौ. अश्विनी जोशी, मो. 97677 33560)

जिंतूर – गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले जिंतूर तालुक्याचा शैक्षणिक विकास करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मागील काही महिन्यात त्यांच्या शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रमामुळे त्यांच्या कार्याचा नावलौकिक सबंध जिल्हाभर होत आहे. “दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण” हे ध्येय निर्धारित करून या ध्येयाच्या साध्यतेसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन वर्षभरात गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
जिंतूर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करून या सत्राच्या अखेरीस संपूर्ण जिंतूर तालुका निपुण करण्याचे प्रयत्न आहेत. या दृष्टीने शाळेच्या सद्यस्थितील शैक्षणिक स्थितीची आढावा घेण्यासाठी दि. 26 व 27 मार्च रोजी ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर येथे सर्व मुख्याध्यापक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत निपुण जिंतूर, आगामी वर्षातील शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे नियोजन, मतदार जनजागृती (SVEEP) कार्यक्रम, Online मिटिंग या विषयावर मयूर जोशी, शालेय पोषण आहार या विषयावर विकास सातभाई, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयावर देवानंद सावंत, कार्यालयीन कामकाज या विषयावर राजेंद्र ढाकणे, Udise plus व इतर शालेय Online कामे या विषयावर लक्ष्मण टाकणसार, समाजकल्याण शिष्यवृत्ती आवेदनपत्र Online भरणे या विषयावर भास्कर मुंढे, Infosis board वर फिरस्त्या चित्रपट दाखवणे या विषयावर अनिल स्वामी, व्हाट्सअप ग्रुपची नियमावली या विषयावर नितीन पेठे, मतदार जनजागृती (SVEEP) विषयावर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर च्या विद्यार्थिनींनी पथनाट्याचे सादरीकरण केले. तर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनात्मक मतदानाचे महत्त्व सांगणारे गीत गौतम खिल्लारे यांनी सादर केले.

गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी आपल्या मार्गदर्शनात या वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी जेवढे उपक्रम व कार्यक्रम राबवले त्यापेक्षा अधिक उपक्रम व कार्यक्रम पुढील वर्षात पूर्ण क्षमतेने राबवावयाचे आहेत. सर्वार्थाने जिंतूर तालुका निपुण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करायचे आहेत. यासाठी सर्वांनी तयारीला लागू या… सूक्ष्म नियोजन करून समर्पित भावनेने शैक्षणिक सेवा देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सिद्ध होऊयात असे प्रतिपादन केले. संपूर्ण आढावा बैठकीचे सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले.

या आढावा बैठकीसाठी केंद्रप्रमुख तुकाराम साबळे, मारोती घुगे, पांडुरंग भांबळे, दिनकर घुगे, शंकर चव्हाण, शिवाजी कऱ्हाळे, निलेश लटपटे, अतीक अन्सारी, संजय स्वामी यांच्यासह सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक, व सर्व शाळा प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here