Home पुणे ग्रोथ एक्सपो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे ग्रोथ एक्सपो प्रदर्शन...

ग्रोथ एक्सपो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे ग्रोथ एक्सपो प्रदर्शन व ग्रोथ अवॉर्ड समारंभाचे आयोजन उत्साहात संपन्न

151

पुणे- ग्रोथ एक्सपो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे ग्रोथ एक्सपो प्रदर्शन व ग्रोथ अवॉर्ड समारंभाचे आयोजन ग्रोथ एक्सपो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील हॉटेल वेस्टीन येथे ग्रोथ एक्सपो प्रदर्शन व ग्रोथ अवॉर्ड समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लगान चित्रपटातील अभिनेते आदित्य लाखिया उपस्थित होते. याप्रसंगी फॅशन मॉडेल प्रिया धुमाळ, ग्रोथ एक्सपो प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक व ग्रोथ अवॉर्डचे आयोजक यशेष शहा उपस्थित होते. या पुरस्कार समारंभामध्ये औद्योगिक शिक्षण ,वैद्यकीय, रियल इस्टेट, हॉटेल या व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या ग्रोथ एक्सपो मध्ये उद्योजकांनी आपल्या प्रॉडक्टचे प्रदर्शन मांडले होते. हे प्रदर्शन दोन दिवस ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विविध उद्योजकांनी भेटी दिल्या. या प्रदर्शनानंतर हे प्रदर्शन मुंबई येथील हॉटेल फर्न येथे 24 व 25 मे 2024 रोजी ग्रोथ एक्सपो मुंबई आयोजित केले जाणार आहे. याचबरोबर ग्रोथ अवॉर्ड मुंबई आयोजित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीनल दोषी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here