अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
परभणी- लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या संत देवईमाय संस्थान नरळद तालुका गंगाखेड येथील मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी आज शुक्रवारी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लोकसभा विजयासाठी विजय भंडारा व नारळ देऊन शुभेच्छा देत मानसन्मान केला.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आज शुक्रवारी श्रद्धास्थान संत देवईमाय संस्थांन चे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. संस्थांचे मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांचा भंडारा लावत शाल व विजयाचे श्रीफळ देत मानसन्मान केला. संत देवईमाय यांचे आशीर्वादाने परभणी जिल्ह्यातील तमाम शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वारकरी यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन असा विश्वास सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यावेळी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विक्रम बाबा इंमडे ,साहेबराव लवंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालक मुंजा महाराज मुलगीर यांनी केले.