चोपडा: येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८/०३/२०२४ रोजी एम. एस्सी. द्वितीय वर्ष भौतिकशास्त्र विषयाची (राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा २०२० नुसार) अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. व्ही. साळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी, सिनेट सदस्य प्रा. पी. डी. पाटील, अभ्यास मंडळ सदस्य प्रा. यु. एस. जगताप व डॉ. एस. डी. बागुल तसेच अमर संस्था संचलित कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. टी. पाटील तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सौ. पी. एम. रावतोळे, डॉ. व्ही. आर. हुसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. सौ. पी. एम. रावतोळे यानी केले.
यावेळी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. व्ही. साळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भौतिकशास्त्राचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम तयार करणे सर्वांसाठी आव्हानात्मक होते त्याच अनुषंगाने हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे ज्याच उद्देश या विषयामध्ये मजबूत पाया प्रदान करणे आणि विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी कौशल्ये आत्मसात करणे आहे आवश्यक आहे’.
यावेळी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी म्हणाले की, NEP- 2020 मुळे होणारे शैक्षणिक बदल व आव्हाने स्वीकारण्याची महाविद्यालयाची तयारी आहे कारण त्यामूळे जर रोजगार कौशल्य असलेली संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी हे गरजेचे आहे’.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात अभ्यास मंडळ सदस्य डी. एन कॉलेज फैजपुर येथील उपप्रचार्य प्रा. उदय जगताप हे सत्राध्यक्ष म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांनी सर्व मान्यवर व उमवि परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांच्याशी चर्चा करून अभ्यास क्रमात काय बदल असावे ते नमूद केले.
या उदघाटन समारंभाचे आभार प्रदर्शन सह- समन्वयक डॉ. व्ही आर हुसे यांनी केले तर सूत्रसंचलन विद्यार्थिनी कु. सिद्धी नेवे हिने केले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागातील प्राध्यापक वृंद निरंजन पाटील, जितेन धोबी, प्राजक्ता वानखेडे व दर्शन पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी नीलेश भाट, जितेंद्र कोळी व विशाल पाटील यांनी परिश्रम घेतले.