✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.,9823995466
उमरखेड : – (दि. 24 मार्च) जगात मानवता शिघ्रगतीने संपत चालली आहे. जर समाजाला जिवंत ठेवायचे असेल तर त्या समाजात मानवता निर्माण करणे गरजेचे आहे जेव्हा माणूस माणूस बनेल तेव्हा प्रेम स्नेह बंधुभावाचा समाज निर्माण होईल.
रोजा व्यक्ती चे चारित्र्य निर्माण करतो म्हणून रमजान
चारित्र्यसंवर्धनाचा महिना आहे.
असे प्रतिपादन इलयास फलाही प्रदेश अध्यक्ष जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र यांनी केले.
ते अनंतराव देवसरकर सभागृहात घेण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत बोलत होते.
रोजाचा उद्देश फक्त उपाशी तापाशी राहणे हा नसून वंचित गरीब यांचे विषयी आपुलकी दया त्यांच्या दुःखांचा अनुभव, इंद्रीया वर नियंत्रण ,आत्मशांती, लालची वृत्ती वर मात , हलाल – हरामा विषयी विवेक जागृत होणे , पापांपासून वाचण्याची शक्ती निर्माण करणे हा रोजाचा उद्देश असल्याचे फलाही म्हणाले
रमजान महिन्यात कुरआन चे अवतरण झाले.
कुरआन संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शन आणि सत्य व असत्याचा फरक स्पष्ट करणारी कसोटी असून पूर्णपणे सुरक्षित अंतिम इशग्रंथ आहे.
जिवंत भाषेतील ग्रंथ असून सर्वकालीन आव्हान करणारा ग्रंथ असल्याचेही नईम शेख म्हणाले,
मानवी समानता एकेश्वरतत्त्व, प्रेषित तत्व, मरणोत्तर जीवन या कुरआनच्या मूलभूत शिकवणी असल्याचेही ते म्हणाले
शेवटी फलाही यांनी सर्वांनी एकत्र येवून देशात न्याय -शांती चे वातावरण निर्माण करण्याचे , एक दुसऱ्याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण करण्याचे, पुण्याच्या चांगल्या कामा त सहकार्य करण्याचे, व्देष, वाईट प्रवृत्ती ला संपविण्या साठी संघर्ष करून विकसीत भारत निर्माण करण्याचे सर्वांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन फिरोज अन्सारी यांनी तर आभार प्रदर्शन खालीद इस्माईल यांनी केले.