बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद संरक्षण विभाग समता सैनिक दल जिल्हा शाखा यवतमाळ (पश्चिम) अंतर्गत समता सैनिक दल पुसद च्या वतीने “महाड चवदार तळे ९७ वा वर्धापन दिना निमित्ताने दिनांक २०/०३/२०२४ बुधवार रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पुसद या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
यावेळी चैत्यभूमी मुंबई येथे नुकतेच पार पडलेल्या समता सैनिक दलाचे प्रमोशन प्रशिक्षण शिबिरात सहाय्यक केंद्रीय शिक्षक प्रमोशन झालेले सैनिक तथा भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे यांचे उपस्थित पदाधिकारी मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहाय्यक केंद्रीय शिक्षक भारत कांबळे, भोलेनाथ कांबळे,ल.पु.कांबळे, प्रल्हाद खडसे,अर्जुन भगत,राहुल पाईकराव, विनोद कांबळे,बाबुराव कांबळे,अशोक कदम,अरविंद हनवते,सुरेंद्र गावंडे,मिलिंद जाधव,विजय बहादुरे,महिला सैनिक संगिता कांबळे, रंजना वाढवे,रमा केवटे, नम्रता इंगळे,मंगला इंगोले,शारदा इंगोले, विद्या गावंडे,विशाखा इंगोले,तसेच ईत्यादी सैनिक व पदाधिकारी मंडळी आणि उपासक-उपासिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तुकाराम चौरे यांनी केले.