Home महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कराड येथील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये...

यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कराड येथील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

123

 

कराड : (दि. २२, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड येथील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेल्या यशवंतांचा सत्कार समारंभ मा. आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला. त्यामध्ये वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड मधील अक्षय राजेंद्र पाटील (सहाय्यक ब्लॉक डेवलपमेंट ऑफिसर BDO २०२२) ,प्रथमेश दत्तात्रय पाटील (राज्य विक्रीकर निरीक्षक STI 2023 ),अनघा रणजितसिंह गायकवाड (ग्रामीण महसूल अधिकारी-तलाठी 2023),आकाश बाबासो चव्हाण (कृषी सेवक 2023) ,आकाश विजय सुर्यवंशी (कनिष्ठ अभियंता 2023) ,अमोल काशिनाथ कारंडे (भूकरमापक 2021),विराज उदय सुर्वे (कनिष्ठ अभियंता 2023) या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोबत संस्थेचे विश्वस्त व सदस्य श्री अरुण पाटील (काका), यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार सर, शिक्षक राजेंद्र पाटील सर,यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख समन्वयक श्री अमित जाधव सर उपस्थित होते.
एमपीएससी परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुलांचे प्रमाण वाढावे यासाठी यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत कमी शुल्क असणाऱ्या या केंद्रामध्ये तज्ञ आणि अनुभवी विषयतज्ञासोबतच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध आहे. यामध्ये सुसज्ज व समृद्ध ग्रंथालय, नानाविध मासिके व वर्तमानपत्रे मुले वाचतात. याबरोबरच इंटरनेट सुविधेसह कॉम्पुटर लॅब व मैदानी सरावासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध असल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राहण्याची मेस सह सशुल्क सोय देखील आहे. चालू निवडणुक वर्षी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सरकारी जागांसाठी, सरकारी सेवांमध्ये जाण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठीची तयारी लवकरात लवकर चालु करणे अपेक्षित आहे. याकरिताची परिपूर्ण बॅच केंद्रामध्ये सुरू होत असून त्यासाठी इच्छुकांनी ८८३०२०१४९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. ग्रामीण भागातील अभ्यासू,मेहनती व महत्त्वकांक्षी  विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र प्रमुख समन्वयक श्री अमित जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here