Home लेख विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते?

विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते?

111

 

माणसांचे मन खुप विचित्र असते.ते कधीच समाधानी नसते. चांगल्या पगाराची उच्च पदस्थ नोकरी, कार्यालयात मान सन्मान नेहमीच आदेश देण्याची सवय मी दिलेला निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असे वागणे. अधिकारी असल्यामुळे सर्व कार्यालयीन कामगार कर्मचारी माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत यांचा कायम गर्व असतो. त्यामुळेच माझे मन कार्यालयात प्रसन्न असते.त्यांचे समाधान घरी गेल्यावर संपते.कारण मी घरात प्रवेश केला की मी आदेश देणारा अधिकारी नसतो. कुटुंबातील एक सदस्य होतो. हा सकारात्मक विचार केल्यामुळेच आनंदीत असतो.तसेच प्रत्येक माणसाने कामगार, कर्मचारी अधिकारी यांनी सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवले तर सर्वच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते हे समजले पाहिजे.
आज काल घरी प्रसन्न मनाने घरी जाणार कामगार, कर्मचारी, अधिकारी जातांना दिसत नाही. लवकर घरी जाण्याची इच्छा मेलेली आहे.चांगला टू बी एच के प्लॉट आहे, टू व्हीलर, फोर व्हीलर गाडी आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. तरी घरी जाऊन बायको मुलामुलींच्या सहवासात राहण्याची व्यवस्था राहिली नाही.घरात कोणीच पाहिजे त्याप्रमाणात सुखी नाही. दुःख,वेदना,चिंता काही प्रमाणात मनात घर करून ठेवल्या आहेत.त्या दूर करण्यासाठी विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते हे समजून घेतले. आणि सकारात्मक विचारांचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
शारीरिक वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! मानसिकता वेदना देणाऱ्या घटना मनातुन काढून टाकल्या तर चिंता पाठलाग करत नाही.त्यासाठी भुतकाळात घुटमळणे बंद केले पाहिजे. माणसात,समाजात वावरताना कोणत्याही प्रकारच्या घटना डोक्यात येणार नाहीत.आणि रिकामे बसले तर आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते,ते एक नसते त्यांची मोठी लिंक लागते.मग त्यातुन बाहेर येणे अशक्य होते.दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता,तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.चांगली बायको मिळाली असती तर सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घेतला असता.आईवडीलांचे ऐकले असते तर तेव्हाच प्लॉट घ्यायला हवा होता,तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.त्यावेळी मी त्यांच्याशी आईवडीलांशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!.या घटना विचारांच्या ऊर्जा निर्माण करतात.मागेच्या घटनाचा विचार करणे सोडून दिले तर स्मार्ट मोबाईल,इंटरनेट,गुगल कसे काम करते त्यांना ती उर्जा कशी व कुठून भेटते याचा शोध घेता येतो.
आज मी चांगल्या पगारावर काम करतो,पण मनाला समाधान नाही,तेव्हा कमी पगारात कुटुंबात सुखी समाधानी होतो.टाईममशीनमध्ये जाऊन ज्या काही घटना घडल्या त्या काही बदलता येणार नाही,तेव्हा आता त्यावर विचार करुन आपण फक्त आणि फक्त,आपली बहुमुल्य उर्जा,फालतुमध्ये खर्च करतो,त्यापेक्षा भुतकाळातल्या त्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेले पाहिजे.त्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे विचार करणे आवश्यक आहे.विचारांची ऊर्जा निर्माण करता आली पाहिजे.प्रत्येक जण दुःखी आहे.आणि बहुतेक दुःखांच मुळ हे तुलनेत असते.प्रत्येकाशी तुलना करीत राहिलो तर हया जगात प्रत्येक गोष्ट,घटना वेगवेगळी असते.त्यांची तुलना सकारात्मक विचाराने केली तर पुढच्या घटना घडनार नाहीत.आणि नकारात्मक विचाराने विचार केला तर न घडणाऱ्या घटना घडविल्या जातील. घरात कार्यालयात किंवा एसटी,रेल्वे प्रवासात धक्का लागला,बसायला जागा उपलब्ध नाही.त्यामुळे होणारी चिडचिड घरातुन कार्यालया पर्यत कार्यालयातुन घरा पर्यत मनातील भावना वेदनेत रूपांतर होते.प्रत्येक वस्तू कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदली होतो.जे जिथे घडले तिथेच सोडून आले तर निश्चितच आनंदी वातावरणात आपण राहू शकतो आणि दुसऱ्याला आनंदी ठेऊ शकतो.प्रत्येक व्यक्तीचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती सर्वच बाबतीने वेगळा असु शकतो.ही विचारांची ऊर्जा आपल्या डोक्यातील मेंदूत असली पाहिजे आणि मेंदूला संदेश कोण देते.डोळे कि मन ?.
आयुष्य कशासाठी आहे यांचे प्रत्येकांनी उत्तर शोधले पाहिजे.आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे,आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे,आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे,आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे.जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे,मनातले सर्व अपराधी भाव,भुतकाळ-भविष्यकाळ,काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे,सगळे सगळे फेकुन द्या,मनमोकळे व्हा,प्रत्येक क्षणाला,निरापराध वृत्तीने, निरागसपणे निःपक्षपातीपणे सामोरे जा!.कधी होईल हे विचारांची ऊर्जा निर्माण होऊच देऊ नका.सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवले तर.अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात.तेव्हा माणूस म्हणतो मी विचारच केला नव्हता हे होईल याचा.
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील,अपेक्षा,अपुर्ण स्वप्ने, ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा! खुप वेळा आपण ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते,त्याच आयुष्य आरामशीर आहे,माझ्याकडे हे का नाही,या अपेक्षेने, तुलनेने दु:खी होत राहतो. तारक मेहता का उलटा चष्मा संपूर्ण कुटुंब एकत्र बसुन पाहत असते. पोपटलालचे पात्र किती गंमतीशीर आहे. समजा,एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता- बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन,त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!,ह्याला म्हणतात, सुखी जीवन! म्हणूनच विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते ते समजून घेतले तर सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवता येते.
माणसाचा स्वभाव आहे जे मिळते त्यात तो समाधान मानत नाही.जे मिळत नाही त्यांची नेहमी अपेक्षा करत असतो. तेव्हा तो समाधानी नसतो पण जेव्हा मिळतो तेव्हा समाधानी असतो काय?. आणि समजा,एके दिवशी लग्न झालेच,प्रत्येकाचे होतच असते, मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु,जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो.सेवा निवृत्तीनंतर आरामात जगता येते हा मोठा भ्रम आहे. उलट सेवानिवृत्तीनंतर घर आणि वेळ खायला उठते.हे सेवा निवृत्तीनंतर समजते.आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!.तेव्हा सकारात्मक विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते समजून घेणे आवश्यक आहे.सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. बघा! किती मजेशीर आहे हे,अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते, दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते. काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो,पण खरे समाधान कुठे आहे?
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना,अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झाले असं म्हणता येईल. म्हणूनच मी सकारात्मक विचाराने सतत लिहत राहतो.छापल्या जाईल की नाही, प्रसिद्ध झाले तर वाचक वाचतील काय?. हे माझ्या मन कधीच येत नाही.म्हणूनच मी दोनशे साठ वृत्तपत्रांच्या इमेल वर लेख पाठवत राहतो. कोण दखल घेतो कोण घेत नाही.त्याची चिंताच नाही.पण लेख वाचल्यावर हजारो वाचकातुन कोणी ना कोणी फोन करून बोलल्या शिवाय राहत नाही.सकारत्मक विचारांची ऊर्जा आणि नकारात्मक विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते हे तथागत गौतम बुद्धांनी अनेक उदाहरणाने दाखवून दिले. विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते.त्यांचा परिणाम कुटुंबावर समाजावर कसा होतो.यांची गांभीर्याने विचार केला पाहिजे.त्यासाठी चर्चा आवश्यक आहे.चर्चा कोणाशी करावी ही समस्या नसावी. कार्यालयात व घरात वेगवेगळी चर्चा होऊ शकते. विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते.हे आपण वृत्त वाहिन्यावरील बातम्या पाहून, किंवा सिरीयल पाहून करू शकतो.फक्त पाहण्याचा दुष्टीकोन वेगळा असला पाहिजे.


सागर रामभाऊ तायडे,
भांडुप मुंबई
९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here