विश्वकर्मीय सुतार समाजाची लोकसंख्या राज्यभरात 36 जिल्ह्यातील 360 तालुक्यातील अंदाजे 50 लाखाच्या जवळपास असल्याचे माझ्या सोशल मीडियावर वाचनात आले आहे. विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक आहे, याची कल्पना समाजातील सर्वच दिग्गज समाज नेत्यांना आहे आणि समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा मुकुट परिधान केलेल्या असंख्य सामाजिक संघटना कार्यरत आहेत यामध्ये काही युवक संघटना यांचा सुद्धा समावेश असतो आणि याच राज्यस्तरीय सामाजिक संघटनेच्या कार्यकरिणी मंडळावर जबाबदार कर्तृत्ववान असणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील सामाजिक,राजकीय क्षेत्रातील कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या विद्वान हुशार सर्वगुणसंपन्न सुशिक्षित बुद्धिवान पदाधिकारी वर्गाची निवड केली जाते.
या पदाधिकारी वर्गामधुनच प्रत्येक सामाजिक संघटनेवर एका जबाबदार कर्तृत्ववान कर्तबगार प्रमुखाची सर्वानुमते निवड केली जाते आणि कालांतराने हेच संघटनेचे प्रमुख विश्वकर्मीय सुतार समाजात कळत न कळत समाज नेतृत्व आणि धडाकेबाज युवक नेतृत्व म्हणुन उदयास येतात अशा पध्दतीने संपूर्ण विश्वकर्मीय सुतार समाजात विविध पातळीवर राज्यस्तरीय समाज नेते सोबतच धडाकेबाज युवक नेते उदयास येतात आणि समाजात समाज नेतेगिरी करतात समाजात यांना मानसन्मान सुद्धा मिळतो.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाला सत्ता संपत्ती ज्ञान आणि राजकीय हिस्सेदारी मिळणे गरजेचे आहे समाजाचा सामाजिक सर्वांगीण विकास करायचा असेल तर मात्र विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाला राजकीय हिस्सेदारी मध्ये सहभागी होणे गरजेचे असते.सद्यस्थितीत राज्यात राजकीय निवडणुकीचे वातावरण तयार झाले असून सर्वच राजकीय पक्ष राजकीय अस्तीत्व टिकवण्यासाठी आणि राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी राजकीय मैदानात उतरलेले आहेत तर दुसरीकडे बहुजन ओबीसी समूहातील विविध संघटना आणि विविध ओबीसी नेत्यांनी आपापल्या पातळीवर राजकीय मैदानात उतरण्याची तयारी केलेली आहे सद्यस्थितीत ओबीसी मुद्द्यावर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे ओबीसींचे आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी आरक्षणा पासून वंचित राहू नये यासाठी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी राजकीय क्षेत्रात समाजाचे प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे लोकसभा आणि विधानसभा सभागृहात समाजाचे प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे.
त्यासाठी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील समाज नेत्यांनी कोणत्याही प्रस्तापित राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले न बनता स्वतंत्र विश्वकर्मा राजकीय आघाडी स्थापन करावी आणि समविचारी बिगर प्रस्तापित राजकीय आघाडी सोबत हातमिळवणी करून समाजाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही जागांची मागणी करावी आणि राजकाणाच्या मुख्य प्रवाहात समाजाला सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावे. समाजाचे पर्यायाने बहुजन समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा सभागृहात विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची नितांत गरज आहे त्यासाठी विश्वकर्मा राजकीय आघाडी स्थापन करावी.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार सामाजिक संघटनेचे राज्यस्तरीय समाज नेते मंडळी विद्वान हुशार, बुद्धिवान, बुद्धिवादी सुशिक्षित उच्चशिक्षित, सर्वगुणसंपन्न आहेत. अनके समाज नेते आर्थिक दृष्टीने सक्षम सुद्धा नक्कीच असतील समाजातील अनेक समाज नेते विश्वकर्मा राजकीय आघाडीला आर्थिक पाठबळ देऊ शकतात यासाठी समाजातील सर्वच समाज नेत्यांनी एकत्र येऊन यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी काही प्रमाणात राज्यस्तरीय समाजाला यासाठी आर्थिक मदतीचे समाज नेत्यांनी आवाहन करावे समाज आपल्या आवाहनाला नक्कीच प्रचंड प्रतिसाद देईल आणि निवडणूक निधी जमा होईल आणि येणाऱ्या राजकीय निवडणुकीत समाजाचे कर्तबगार उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा लोकसभा आणि विधानसभा सभागृहात समाजाचे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी समाजाला बघायचे आहेत यासाठी जागावाटपावर सामोपचाराने तोडगा काढावा.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील समाज नेत्यांनी विकासात्मक राजकीय जाहीरनामा तयार करावा समाजातील समाज नेते सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिवान आहेत समाज नेत्यांनी राजकीय मसुदा तयार करावा आणि त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी विश्वकर्मा राजकीय आघाडी आणि बिगर प्रस्तापित राजकीय आघाडी सोबत चर्चा करून राजकीय अजेंडा तयार करून प्रसिद्ध करावा.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाला राजकीय हिस्सेदारी मिळविण्यासाठी राजकीय निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करणे हाच एकमेव पर्याय आहे याचा विचार स्वतःला समाज नेते समजणाऱ्या समाज नेत्यांनी करावा निवडणुकीत काही लोकसभा मतदारसंघात काही मुरब्बी समाज नेत्यांनी तर काही मतदारसंघात युवक नेत्यांनी राजकीय मैदानात उतरावे त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात मुरब्बी समाज नेत्यांनी तर काही मतदारसंघात युवक नेत्यांनी राजकीय मैदानात उतरावे अशा पध्दतीने समतोल राखावा जेणेकरून विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजाचे अनेक लोकप्रिय लोकप्रतिनिधी समाजाला मिळतील त्याचा फायदा बहुजन समाजाचे विविध प्रश्न लोकसभेत आणि विधानसभा सभागृहात सोडवण्यासाठी प्रयत्न करतील.
विश्वकर्मा राजकीय आघाडीच्या आणि सहयोगी राजकीय आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी समाज नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी प्रचार सभांचे आयोजन करावे यासाठी प्रचार यंत्रणा तयार करावी आपापल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यामध्ये सहभागी करून घ्यावे. प्रचाराची धुरा समाजातील निवडक जबाबदार कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात यावी विशेषतः निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारक म्हणुन विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील काही विद्वान अभ्यासू युवक नेत्यांची आणि काही अनुभवी दिग्गज मातब्बर विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज नेत्यांची नेमणूक करावी आपण राजकीय मैदानात यशस्वी नक्कीच व्हाल आणि आदर्श राज्यस्तरीय विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजासह बहुजन समाजात सुध्दा नावाजलेले नामांकित नेतृत्व करण्यासाठी पात्र ठराल.
प्रमोद सूर्यवंशी,
चिखली मातृतीर्थ, बुलडाणा
मो. 8605569521