धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर
धरणगाव — येथील रहिवासी लक्ष्मणराव पाटील यांच्या शेतात वेस्टीजियन लोकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये वनभोजन, सत्कार, मनोगत, मार्गदर्शन अशा स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वेस्टीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या डायरेक्ट सेलिंग मार्केटमधील नंबर ०१ असलेल्या कंपनीचा मिटिंग व स्नेहभोजनाचा कार्यक्रम निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम अस्सल खान्देशी मेनू वरण – बट्टी – वांग्याची भाजी व शिरा चा सर्वांनी आस्वाद घेतला. तद्नंतर वेस्टीज इंडिया बद्दल ची प्रास्ताविकपर माहिती सिल्व्हर डायरेक्टर लक्ष्मणराव पाटील यांनी करून दिली. कार्यक्रमात फास्ट स्टार्ट 8 परसेंट, 12 परसेंट, ब्रॉंझ डायरेक्टर, सिल्व्हर डायरेक्टर, गोल्ड डायरेक्टर, डायमंड डायरेक्टर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये प्रफुल पवार, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, सरला पाटील, ममता चव्हाण, माधुरी पाटील, पूजा पाटील, तिलोचना बडगुजर, सुनिल देशमुख, सपना पाटील, ज्योती पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत अनुभव कथन केले. कंपनीच्या प्लॅन बद्दल सविस्तर माहिती गोल्ड डायरेक्टर दिपक काळे यांनी करून दिली. यशस्वी कसे व्हावे याचे सूत्रबद्ध नियोजन ग्रेट लीडर तथा डायमंड डायरेक्टर समाधान पाटील सरांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा पाटील, धनश्री पाटील, प्रिया पाटील, लिना पाटील, दिनेश पाटील, सागर पाटील, मुन्ना पाटील, राहुल पाटील, राकेश पाटील, गोकुळ पाटील, दिलीप पाटील, दादू पाटील, गणेश कोळी यांच्यासह वेस्टीज परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.