धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव -येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा मंगल कार्यालयाची नविन वास्तु उभारणीचे बांधकामाचे काम जोरदारपणे सुरु असुन त्या अदमासे सात हजार स्केअर फुट बांधकामाचा आज पहीला मजलाचे स्लॅब टाकण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरूवात करण्यात आली आहे…
सदर दोन मजली बांधकामास पार्किंग सह विविध सुविधाजनक परीपुर्ण कामास तिन कोटी पेक्षा अधिक खर्च अपेक्षित असून अजुनही बरेचसे काम बाकी आहे. आज सकाळीच पहिला मजला स्लॅब चे जेष्ठ पत्रकार व समाजाचे जेष्ठ पंच तसेच माजी कोषाध्यक्ष कडू महाजन यांचा हस्ते व विविध पदाधिकारी सह पुजन करण्यात आले व कामास सुरुवात करण्यात आली
तरी समाज बांधवानी उर्वरित कामासाठी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन पंच मंडळाचा वतीने करण्यात येत आहे….
पुर्वी ज्या दानशुर दात्यांनी देणगी दिली त्यांचे समाज पंच मंडळाचा वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे
आज कामाची पहाणी करंताना समाजाचे उपाध्यक्ष शिवाजी देशमुख,आर्किटेक्ट शाह, राजेंद्र महाजन,भटु महाजन,दिपक महाजन,गोरख देशमुख,अनिल महाजन,सह आदि पंच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते