✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि.14 मार्च) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 ला आपल्याला बौद्ध धम्म दिला. आणि या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जगामध्ये प्रसार झाला पण आजचा बौद्ध समाजामधील तरुण मंडळी वाईट व्यसनाला लागून बौद्ध धम्म परिषदेमध्ये दारू पिऊन धिंगाणा करणे हेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बौद्ध धम्म परिषदेमध्ये काही तरुण सहभागी होतांना दिसत आहेत.
महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी धम्म परिषदेचे आयोजन वेगवेगळ्या समाज बांधवांकडून अतिशय सुंदर केली जाते. पण काही तरुण मंडळी उगाच धिंगाणा घालून कार्यक्रमाला काळी फसतात असे मत प्रणिता कांबळे यांनी व्यक्त केले आहे. व पुढे म्हणाल्या की,
बौद्ध धम्म परिषदेच्या अध्यक्ष व समिती आयोजक या सर्वांना एक विनंती आहे की, अशा तरुणांकडे विशेष लक्ष दिले जावे.
जेणेकरून बौद्ध धम्म परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही.
पण आजची तरुण पिढी वाईट व्यसनाला लागून चांगल्या कार्यक्रम सुरू असतांना शिल्लक कारणावरून वाद निर्माण करून तो वाद विकोपाला जाऊन दोन गटांमध्ये हाणामारी होतात.
व ते पुढे म्हणाल्या की कार्यक्रम बौद्ध धम्म परिषदा अतिशय सुंदर प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. पण येणारी तरुण मंडळींनी विनाकारण वाद निर्माण करून कार्यक्रम उध्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे की काय ? असा प्रश्न समाजसेविका सामाजिक कार्यकर्त्या दानशूर प्रणिताताई कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच बौद्ध धम्म परिषदेच्या आयोजकांनी या तरुण मंडळीची बसण्याची व्यवस्था वेगळी करावी कारण यांच्यामुळे चांगल्या कार्यक्रम वादग्रस्त होऊ शकतो म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी बसण्याची वेगळी व्यवस्था करावी लागेल अशी प्रतिक्रिया आमचे जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.