Home महाराष्ट्र दोन कोटीचा भ्रष्टाचार प्रकरण, नगर परिषद फंडाचा केला फंडा! ...

दोन कोटीचा भ्रष्टाचार प्रकरण, नगर परिषद फंडाचा केला फंडा! साड्या खरेदी 4 लाख तर खिचडी भजे खर्च 92 हजार रूपये

86

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

 

गंगाखेडः नगर परीषदेतील प्रशासक (तत्कालीन) सी.ओ. तुकाराम कदम लेखाधिकारी जुबेर व लिपीक सुरेश मणीयार यांनी बोगस बिले सादर करीत शासनाची फसवणूक केल्याचे दिसत आहे अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचा खिचडी भजे पुलाव याचा खर्च 43 हजार 500 तर शासन आपल्या दारी कार्यक्रमातील नाष्टा खर्च 49 हजार 155 तर चांदणी साडी सेंटर मधून 4 लाख 66 हजार 859 रूपायाची खरेदी देयके दिल्याचे दाखवून दोन कोटीचा अपहार प्रकरणी चौकशी समिती नगर परीषदेत दाखल होणार आसल्याचे संतोष टोले यांनी स्पष्ट केले आहे.
नगर विकास प्रधान सचिव यांना संतोष टोले यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन सर्व पुरावे सादर करीत गंगाखेड नगर परिषद मालमत्ता पाणीपटटी शांपीग सेंटर किराया या करातुन लाखो रूपये जमा रक्कमातुन शहराच्या विकासाचा नावाखाली खोटी देयके सादर करून दोन कोटीचा अपहार करण्यात आल्याचे पुरावे प्रधान सचिवाना सादर करण्यात आले यात सन 2021-22 मध्ये चांदणी साडी सेंटर यांना अदा करण्यात आलेल्या 3 लाख 57 हजार 761 रक्कमेत स्वच्छता महिला कर्मचारी यांना साड्या पंजाबी ड्रेस ब्लाउसपीस पुरूषाना पॕट कपडा शर्टपीस आॕफीस ड्रेस कोड कपडा खरेदी करण्यात आला संक्रात सणा निमित्त चांदणी साडी सेंटर मधुनच 1 लाख 9 हजाराचे साडी नऊवार ब्लाउजपीस घेण्यात आले.गोदावरी स्वच्छता अभियान व दि.25 जानेवारी 2024 रोजी अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना 17 हजार 900 रूपायांची खिचडी भजे चहा पुलाव खाण्याचे बील अदा करण्यात आले तर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिम दरम्यान खाद्य पुरवठा प्रकरणी 25 हजार 600 रूपायाचे बील अदा करण्यात आले.शहरातील विकास कामासाठी निधी आणल्या बाबत आ.डॉ.गुट्टे यांच्या सत्कारासाठी 20 हजाराचा खर्च करण्यात आला तर नगर परीषदेत आ.डॉ गुट्टे यांच्या सत्कार खर्चाची 28 हजार 975 रूपयाचे देयके देण्यात आली.कोट्यावधीचा निधी नगर परीषदेस दिला सत्काराची देयके काढणे म्हणजे भ्रष्टाचाराचा कळसच झाला.शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना 49 हजार 155 रूपयाचा नाष्ठा देण्यात आला आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने नदी परीसर सफाई बाबत 1 लाख 72 हजार 260 रूपायाचे देयके देण्यात आली.शहरास सातत्याने दुषीत पाणी पुरवठा होत आसताना सुद्धा ब्लिंचीग पावडर खरेदीचे 1 लाख 47 हजार 378 देयके देण्यात आली प्रभाग 3 मधील भागात तीन महिने टॕकर पाणी पुरवठाचे दोन लाखाचे देयके देण्यात आली.खरच पाणीपुरवठा केला का असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रभाग 11 मध्ये जून मध्ये एकच महिना टॕकर पाणीपुरवठाचे 3 लाख 71 हजार 795 रूपयाचे देयके देण्यात आले खरच पाणीपुरवठा केला आसेल का ? तर दैनंदिन साफ सफाई करिता टॕकरने आॕक्टोबर ते नोव्हेबर 2021 मध्ये केलेल्या पाणीपुरवठा यावर 3 लाख 63 हजार 16 रूपायाचे देयके काढण्यात आलेले आहे.अशा प्रकारे : विविध व्यक्तीच्या नावाने व एजन्सीच्या नावाने जे देयके सादर करून बिले अदा करण्यात आली त्या सर्व संचिका ताब्यात घेवून संचिकाची निपक्ष चौकशी केल्यास अपहार उघडच होणार आहे काही देयके नगर परिषदेत काम न करता सादर केलेली आहे तर काही देयकांची रक्कम फुगवून सादर केलेली आहे अनेक देयके विकासाची कामे न करता सादर करून तत्कालीन सीओ तुकाराम कदम,अकाउंटट सय्यद जुबेर, लिपीक सुरेश मनियार यांची सखोल चौकशी येणाऱ्या पथका मार्फत होणार आसल्याचे संतोष टोले यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here