रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मेंढा ख. येथे बाल आनंद मेळावा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थ आणि वस्तूंचे स्टॉल्स लावले. विद्यार्थ्यांमधील व्यावहारिक गुण विकसित करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. वाय. कोरे सर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा योग्य दिशेने विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये बालआनंद मेळाव्याचे आयोजन केले होते.संकल्पनेतून आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पालकांची मदत घेऊन विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारणे अपेक्षित होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स लावून त्या वस्तू विद्यार्थी यांना विकण्याचा प्रयत्न केला.
येणाऱ्या पिढीसाठी या क्षेत्रात प्रगतीसाठी उत्तम संधी आहे. याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून होतो आहे ही बाब समाधानाची असून कौतुकाची आहे.”
, “विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांच्या विकसना बरोबरच दैनंदिन व्यवहार त्यांना समजले पाहिजेत. व्यवहारीक जगाची त्यांना ओळख झाली पाहिजे यासाठी व एक सुजाण नागरिक घडविण्यासाठी आकाश विद्यालय मेंढा येथे बाल आनंद मेळावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. आर. वाय. कोरे सर.शिक्षक वृंद सौं. कुंभलवार मॅडम , सौं.जगनाळे मॅडम , श्रीमती भांडारकर मॅडम कु. मडावी मॅडम श्री , मडावी सर एम. मेश्राम सर यांनी परिश्रम घेतले.