Home बीड वेलडन एकशिंगे साहेब! दरोड्याच्या गुन्ह्यातील १ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल केला फिर्यादीस...

वेलडन एकशिंगे साहेब! दरोड्याच्या गुन्ह्यातील १ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल केला फिर्यादीस परत सपोनि नारायण एकशिंगे यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक गुन्हे उघडकीस चकलांबा पोलीस ठाणे जिल्ह्यात टाॅपर : सपोनि नारायण एकशिंगे यांच्या कामगिरीमुळे नागरिकांतून कौतुक

75

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

गेल्या काही महिन्यापूर्वी चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता तसेच तपास पूर्ण करून चकलांबा पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या तसेच या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेला मुद्देमाल चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी फिर्यादीला परत करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत तीन जबरी चोरी तसेच पाच रात्रीच्या घरफोडी एक दिवसाची घरफोडी झाली होती. परंतु चकलांबा पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांनी जिगर दाखवत तीनही जबरी चोऱ्या उघडकीस आणून आरोपीसह मुद्देमाल जप्त केला आहे.
चकलांबा पोलीस घोरपडी करणाऱ्या चोरांच्या मार्गावर बऱ्याच दिवसापासून होते. चकलांबा पोलिसांनी रेकॉर्ड वरील अट्टल पाच दरोडेखोर पकडून त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक केली असून लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. कोळगाव परिसरात दरोडा टाकून लाखोचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला होता. तसेच अनेक दिवस सदर प्रकरणातील आरोपी फरार होते. तसेच या पुण्यात चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे मी मोठ्या शिताफीने या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. तसेच दरोड्यात लुटलेला ऐवज आरोपीकडून हस्तगत केला आहे. तसेच १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी परत केला आहे. यामुळे चकलांबा पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. चकलांबा पोलीस ठाण्यात सन २०१३ रोजी एक दरोडा १३ जबरी घरफोडी पैकी १ दरोडा ७ घरफोडी उघड यामध्ये सन २०२४ मध्ये ३ घरफोडी २३ जबरदस्त एकूण ३८ पैकी ३५ उघड करण्यास यश चकलांबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे व त्यांच्या टीमला आले. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरात सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक केले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here