Home पुणे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याच्या पर्वात मराठी कलाकारांची मांदियाळी

महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याच्या पर्वात मराठी कलाकारांची मांदियाळी

72

 

पुणे – शालिनी फाउंडेशन व सेलिब्रिटी इंडिया न्यूजतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा ने यंदा डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात रंजन, पोलिस महानिरीक्षक जे डी सुपेकर, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सल्लागार व भाजपा, महाराष्ट्र च्या प्रवक्त्या श्वेता शालिनी, जेष्ठ विनोदी अभिनेते विजय पाटकर, बिग बॉस विजेते शिव ठाकरे, प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार, सामाजिक कार्यकर्ते उमेश शहा, डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ डॉ. संजीव चौबे अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीं तसेच मराठी हिंदी चित्रपट व मालिकेतील अभिनेत्री मोनालिसा बागल आदींना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मनपा चे मुख्य लेखापरीक्षण अधिकारी अंबरीश गलिंदे व वरिष्ठ आयकर अधिकारी शेखर पवार,शालिनी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल गोरे यांच्या हस्ते पुण्यातील रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी शालिनी फाउंडेशनच्या मदतीने कॅन्सर मुक्त झालेल्या फ्रान्सिस्का डिमेलो यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

शालिनी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विशाल गोरे यांनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यास फाऊंडेशन चे सचिव डॉ. शैलेश चौबे, संचालक आनंद केशव यांचे सहकार्य लाभले. खजिनदार सृष्टी कुमार यांनी संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here