Home मुंबई मराठा आंदोलनाचे अग्रणी कार्यकर्ते योगेश केदार यांना लोकसभा निवडणुक निमित्त आलेली संधी...

मराठा आंदोलनाचे अग्रणी कार्यकर्ते योगेश केदार यांना लोकसभा निवडणुक निमित्त आलेली संधी !! शिवसेनेच्या प्रवक्ते पदी धाराशिवचे सुपुत्र योगेश केदार यांची नियुक्ती.

80

 

जगदीश का. काशिकर,
मो. ९७६८४२५७५७

 

मुंबई :आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर योगेश केदार यांचा प्रवेश लक्ष वेधून घेणारा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा लढण्याची इच्छा समाज माध्यमातून व्यक्त केली होती. जिल्ह्यात सद्ध्या शिवसेनेकडून संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. सध्या राज्यात प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशी चळवळ उभी आहे. त्यात एका सामान्य मराठा कार्यकर्त्याला संधी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांचे सचिव असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी देखील बरीच कामे केली आहेत. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे प्रकल्प मंजूर करून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. धाराशिव जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर करून आणले. धाराशिव आणि लातूर जिल्ह्या करता गॅस पाइपलाइन ची योजना आणली आहे. काही दिवसांपूर्वी तेर येथील गोरोबा काका मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा मिळवून दिला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ष निवास स्थानी मराठा आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असणार्या योगेश केदार यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यांना पक्षाच्या प्रवक्ते पदाची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. मराठा चळवळी बाबत मुद्देसूद भूमिका मांडणारे योगेश केदार हे चळवळ उभी करणाऱ्यां पैकी ते एक आहेत. यांनी मनोज जरांगे यांच्या बाजूने देखील माध्यमांमधून त्यांनी सकारात्मक बाजू लावून धरली होती. आता यापुढे ते मनोज जरांगे आणि सरकार यांच्या मध्ये दुवा साधणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here