Home महाराष्ट्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाची गॅरेंटी का देत नाही ? हर्षवर्धन...

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावाची गॅरेंटी का देत नाही ? हर्षवर्धन देशमुख यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल ! शेतकऱ्यांना गॅरेंटी का देत नाही ?

96

 

रुपेश वाळके दापोरी प्रतिनिधी /
मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणलेल्या ८ कोटी २२ लक्ष रुपयांच्या विवीध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उपस्थित असतांना पंतप्रधान मोदी अनेक गोष्टीची गॅरंटी देतात. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गॅरंटी मोदीजी कां देत नाही, असा प्रश्न उपस्थित करत शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
बांगलादेशात दोन वर्षात पाचव्यांदा आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावर प्रति किलो ८८ रुपये कर आकारला जात आहे, तर तीन वर्षांपूर्वी ही रक्कम प्रति किलो १८ रुपये होती. त्याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. संत्र्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नसल्याने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच सतत तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला देखील समोर जावे लागत आहे. बांगलादेशाने संत्र्यावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्र्याचे भाव पडले असल्याचा आरोप शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी यावेळी केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टीची गॅरंटी देतात. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गॅरंटी कां देत नाही, ती गॅरेंटी देखील मोदीजींनी दिली पाहिजे. इतर बाबती हमी देता, त्याच त्याचप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना का हमीभाव देत नाही. असा प्रश्न उपस्थित करत शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या कपासाचे भाव हे सहा हजारावर गेले. आज कापसाला क्विंटल मागे 12 हजार रुपये खर्च लागतो. म्हणजे नफा तर दूर आज शेतकरी तोट्यात जाऊन शेती करत आहे. अशी जर शेतकऱ्यांची अवस्था राहिली, तर मला असं वाटतं, तुमच्या त्या विकासाच्या योजनांचं काय करावे. शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसेच येणार नसतील, शिवाय उरले सुरले पैसे ही फुकट शेतीत जात असतील तर सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांच्या खिशावर डाकाच टाकत आहे. त्यामुळे सरकारने ही डाकेखोरी बंद केली पाहिजे, असे मत शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here