Home चंद्रपूर महाशिवरात्री उत्सव निमीत्य शिवटेकडी वर कर्मवीर विद्यालय नागभीड येथील स्काऊट आणि गाईडचा...

महाशिवरात्री उत्सव निमीत्य शिवटेकडी वर कर्मवीर विद्यालय नागभीड येथील स्काऊट आणि गाईडचा स्तुत्य उपक्रम

43

 

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:-कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व राजमाता जिजाऊ गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.देविदास चिलबुले यांच्या उपस्थित दिनांक 08/03/2024 रोज शुक्रवारला महाशिवरात्री निमित्ताने शिवटेकडी नागभीड येथील यात्रेमध्ये स्काऊट मास्तर प्रा, किशोर नरुले यांच्या नेतृत्वात यात्रेकरुसाठी पाणी वाटप केले.
भारत स्काऊट आणि गाईड यांच्या उपक्रमाचा भाग असलेला उपक्रम म्हणजे यात्रा ,सण किंवा सामाजिक कार्यामधे सेवा देणे हा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवमंदिराच्या पायथ्याशी विविध ठिकाणी खिचडीचे स्टाँल लागलेले होते तेव्हा तेथे जाऊन भारत स्काऊट आणि गाईड कर्मवीर विद्यालय नागभीडच्या विद्यार्थ्यांनी शिवभक्तांसाठी खिचडी वाटप व पाणी वाटपाचे कार्य केले. त्यांच्या कार्यासाठी व सेवेसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
एवढ्या सेवेवरच न थांबता सर्व स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर विद्यालय तथा महाविद्यालयाच्या वतीने टेकडीच्या मध्यभागी पाणी वाटपाचे स्टाँल लावले व न थकता महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक तथा स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी रखरखत्या ऊन्हात शिवभक्तांना पाणी पाजुन त्यांची तहान भागवत होते.खरंच त्यांचे हे कार्य अभिनंदनीय होते.विद्यार्थ्यांसी त्यानी केलेल्या सेवेविषयी चर्चा केली असता विद्यार्थी म्हणाले की,या पुढे ही ईश्वराने आम्हाला अशीच सदैव ईतरांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी ईच्छा व्यक्त केली.
या सेवेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रा.स्वप्निल नवघडे,प्रा.निखिल कोल्हे सहाय्यक शिक्षिका सौ.कुंदाताई गिरडे यांनी सहकार्य करुन विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here