Home महाराष्ट्र महाराष्ट्र साहित्य परिषदे नगर शाखेच्या वतीने राजीव राजळे स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर.

महाराष्ट्र साहित्य परिषदे नगर शाखेच्या वतीने राजीव राजळे स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर.

85

 

अहमदनगर – महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगरच्या वतीने यावर्षी साहित्य पुरस्काराची घोषणा केली असून यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यावेळी महाराष्ट्रातील तीनशे लेखकांनी आपल्या साहित्यकृती पाठवून सहभाग नोंदवला यातून जे पुरस्कार जाहीर करण्यात आले त्याची घोषणा आज साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड व कार्याध्यक्ष डॉ.चंद्रकांत जोशी यांनी केली.
सदर पुरस्कार हे नगर जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यप्रेमी स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणार आहेत. राजीव राजळे हे दहाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होतें.
कोल्हापुर येथील प्रसिद्ध कादंबरीकार सुरेश पाटील यांना राजीव राजळे स्मृती साहित्य साधना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकरा हजार रुपये रोख मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यामध्ये साहित्यकृतीच्या विभाग वार पुरस्कार पुढील प्रमाणे
*कादंबरी पुरस्कार*
1. बाळासाहेब लबडे – गुहागर शेवटची लिओग्राफिया
2. विलास शेळके – पुणे मोगलाई
3. अशोक लिंबेकर – संगमनेर कोलाज
*जिल्हास्तरीय पुरस्कार*
– अशोक निंबाळकर – माहीलका
– भूपाली निसळ – नगर अनादिसिद्धा
*कथा पुरस्कार*
1. भास्कर बंगाळे -सोलापूर, वाटणी
2. लक्ष्मण दिवटे – आष्टी, उसवण
3. मनोहर इनामदार – जामखेड,गवसणी
*काव्य संग्रह*
1. माधुरी मरकड – पुणे,रिंगण
2. गीतेश शिंदे – ठाणे,सी सी टी व्ही च्या गर्द छायेत
3. मंदाकिनी पाटील -बदलापूर आत्मपीठ
*प्रकाशन विभाग विशेष पुरस्कार* *
1. बाळासाहेब घोंगडे – अक्षर वाडमय प्रकाशन, पुणे

*आत्मचरित्र*
1. पोपट काळे -पुणे, काजवा
2. सुनील गोसावी -नगर, आठवणींचा डोह

*विशेष चरित्र*
1. कै. शंकरराव घुले संघर्ष गाथा, संपादक – अविनाश घुले, नगर-
*संकीर्ण*
1. विनोद शिंदे – नगर,नॉट थिंग्स बट मेन
2. आशिष नीनगुरकर – मुंबई उजेडाच्या वाटा
तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेच्या वाटचालीत व साहित्य क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये
1. चंद्रकांत पालवे
2. प्रा. मेधा काळे
3. प्रा. खासेराव शितोळे

सदर पुरस्काराचा वितरण समारंभ मार्च किंवा एप्रिलच्या महिन्यात होणार असून पुरस्कार मिळालेल्या सर्व साहित्यिकांचे महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे प्रमुख कार्यवाह शिल्पा रसाळ, सहकार्यवाह डॉ.श्याम शिंदे,उपाध्यक्ष दशरथ खोसे, शिरीष मोडक,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर ,खजिनदार डॉ. शितल म्हस्के, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडूळे व सर्व कार्यकारी सदस्यांनी केले आहे.

प्रसिध्दी साठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here