देवळाली प्रवरा ता राहुरी – देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालयात आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि लता मंगेशकर यांना हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषदेचे ग्रंथपाल संभाजी वाळके, अग्निशमन अधिकारी भारत साळुंखे, नंदू शिरसाठ, बाळासाहेब भोंडगे,राजेंद्र पोकळे, राजेंद्र कदम, वसुली अधिकारी नानासाहेब टिक्कल,सोमनाथ सूर्यवंशी,दीपक भूमकर, अशोक जाधव,गोरक्षनाथ सरोदे, ज्ञानदेव सरोदे बबन शिंदे,गोरख भांगरे व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी देवळाली प्रवरातील सर्व महिला बचत गट पदाधिकारी व सदस्य यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.