Home चंद्रपूर वन वनवा प्रतिबंध अभियानात महिलांचा उस्फुर्त सहभाग कोरंभी ग्रामसभेचा उपक्रम.

वन वनवा प्रतिबंध अभियानात महिलांचा उस्फुर्त सहभाग कोरंभी ग्रामसभेचा उपक्रम.

82

 

संजय बागडे 9689865954

नागभिड— अतिदुर्गम आदिवासी कोरंभी ग्रामसभेच्या वतीने दोन दिवस श्रमदानाने वन वणवा प्रतिबंध अभियान यशस्वीपणे संपन्न झाले. या अभियानात कोरभी येथील महिलांनी सुद्धा उस्फुर्त सहभाग घेऊन योगदान दिले आहे. आपली दैनिक कामे, मजुरीचे कामे सोडून गावातील सर्व महिलांनी गाव सभोवतालच्या परिसरातून कचरा कापून फायर लाईन ओढण्याचे काम केले आहे. ग्रामसभेला सामूहिक वनहक्क क्षेत्रात वन वणवा लागू नये तसेच गाव शेजारील जंगलातून गावाकडे आग येऊ नये या हेतूने वन वणवा अभियान ग्रामसभेने राबविले आहे.आज सकाळी सात वाजता अभियानाचे काम सुरू झाले. पुरुषांचे दोन गटाने डोंगर माथ्यावर फायर लाईन चे काम केले तर महिला गटाने गाव सभोवताल सफाईचे काम केले. यावेळी रानात सामूहिक या कामात सुमारे १५० ग्रामवाशी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here