धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव : देशभरात घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२४ सत्र -१, संयुक्त परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये धरणगाव अधिकृत पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ व ललिता वाघ यांचा चिरंजीव साई राजेंद्र वाघ याने ८८ पर्सेंटाइल मिळवून आपले कौशल्य दाखवून यश प्राप्त केले आहे. त्याने अतिशय खडतर प्रवास करून हे यश संपादन केले आहे.
धरणगाव शहरातील सत्यशोधक विचार मंच व धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने घरी जाऊन साई व त्याचे पालकांचे माजी गटविस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे लिखित “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ” व दर्शना पवार लिखित “माता रमाई यांचे चरित्र ” व गुलाबपुष्प देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार अँड वसंतराव भोलाणे, तालुकाध्यक्ष धर्मराज मोरे, शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव, अविनाश बाविस्कर, निलेश पवार, सत्यशोधक विचार मंचाचे एच डी माळी, पी डी पाटील, गोरख देशमुख, दिनेश भदाणे, तुषार पाटील, योगेश वाघ, राहुल वाघ, मयूर भामरे, अविनाश माळी, रघुनाथ माळी तसेच धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सन्माननीय पत्रकार व सत्यशोधक विचार मंच चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी साईच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याचे अभिनंदन व कौतुक केले.