पुसद प्रतिनिधी/बाळासाहेब ढोले
श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०६ वा पुण्यतिथीनिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद् संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन २६ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत श्री. समर्थ नागोजी महाराज परिसरात करण्यात आले होते.
भागवताचार्य ह.भ.प.गोविंद गुरु शास्त्री महाराज (कार्लेकर)यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधन झाले.तर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक ह.भ.प.सौ.सिमाताई सुधीर गादेवार, ह.भ.प.सौ.बेलेताई, ह.भ.प.सौ.मिराबाई हुडीकर ह्या उपस्थित होत्या. सोमवारी (ता.२६) ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख (प्रति इंदोरीकर नांदेड) ,मंगळवार (ता.२७)ह.भ.प. ओम महाराज निळकंठे सौजन्य संतोष देविदास पुलाते,(ता.२८)ह.भ.प.किशोर महाराज दिवटे भजन सम्राट जालना सौजन्य स्व .रामजी टेकाळे स्मृतीप्रित्यर्थ विनोद रामजी टेकाळे,(ता.२९) ह.भ.प.अंजलीताई केंद्रे उदगिरकर सौजन्य श्री समर्थ नागोजी महाराज महिला मंडळ ,(ता.१)ह.भ.प. अजय महाराज विदर्भरत्न (दादा) अनसिंगकर सौजन्य कृष्णाई महिला बचत गट,(ता.२) ह.भ.प.वैजनाथ महाराज थोरात (प्रति ठोक महाराज)सौजन्य विकास उत्तम आबाळे (म.पो.),(ता.३) श्री समर्थ नागोजी महाराज पुण्यतिथी निमित्त सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या करिता पुसद ते मांडवा मोफत सेवा श्री समर्थ नागोजी महाराज ऑटो युनियन यांनी मोफत सेवा दिली .त्यानंतर ह.भ.प.नारायण केंद्रे शास्त्री सौजन्य श्री समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना,(ता.४) सकाळी ९ वाजता गावातील मुख्य मार्गाने श्रीची पालखी काढण्यात आली .त्यानंतर ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे मलकापूर,मंगळवारी १ वाजता ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे यांचे काल्याचे किर्तन झाले.
सप्ताहामध्ये निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या तसेच देवस्थानास ॲड. विकास पारध यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला.