बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
संरक्षण प्रशिक्षणाद्वारे, मुलींनी मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्षम बनवण्याची गरज आहे. जेणेकरून त्या संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे संरक्षण करू शकतील. मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना स्वयं-कौशल्य आत्मविश्वास व जागरूकता विकसित होतेय असे प्रतिपादन विस्तार
अधिकारी गंगाखेडेकर यांनी केले ते जिल्हा परिषद शाळा झापेवाडी ता.शिरूर येथे तपासणी साठी गेल्या असता राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हे शाळेवर नियमीत सुरु आहे असे निदर्शनास आले यावेळी मुलींना त्यांनी आत्मरक्षा प्रशिक्षणाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून विशद करताना बोलत होत्या
शिरुर तालुक्यातील झापेवाडी जि.प.शाळेत विस्तार अधिकारी गंगाखेडेकर मॅडम २२ फेब्रुवारी २०२४ ला हंगाम तपासणी साठी गेले असता राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हे शाळेवर नियमीत सुरु आहे असे निदर्शनास आले. मुलींना त्यांनी आत्मरक्षा प्रशिक्षणाचे महत्व आपल्या मार्गदर्शनातून विशद केले पुढे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व संरक्षण तंत्र शिकणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींसाठी हा उपयुक्त संरक्षण तंत्र कार्यक्रम आत्मनिर्भर बनवून तणाव कमी करण्यासाठी त्यांनी स्व-संरक्षण कौशल्ये शिकण्याचा उत्तम मार्ग असेल असे प्रतिपादन केले शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर यांनी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणामुळे मुलींचा आत्मविश्वास तसेच उत्साह वाढल्याचे सांगितले . परदेशी सर यांनी महाराष्ट्र परिषद शिक्षण मंडळ यांचे आभार मानले .