श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे प्रबंधक श्री. टी. टी. काटकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
श्री काटकर हे 1990 मध्ये या महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक या पदावर रुजू झाले होते. त्यानंतर आपल्या कामाच्या कौशल्याने त्यांनी वरिष्ठ लिपिक, अधीक्षक व प्रबंधक या पदावरही अतिशय चांगले काम केले. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयांमध्ये नॅकच्या तीन सायकल पूर्ण झाल्या, आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाले. तसेच बी.बी.ए. व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे एम.बी.ए. कोर्स सुरू करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळाले. 33 वर्षे पाच महिने अशा दीर्घ सेवेनंतर त्यांच्या नियत वयोमानानुसार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्ती करण्यात आली. ते शिस्तप्रिय, मनमिळावू, लोकांना मदत करणारे, कार्य कुशल, विद्यार्थी प्रिय असे व्यक्ती होते. त्यांच्या कामाची दखल म्हणून महाविद्यालयातर्फे संस्थेचे विश्वस्त व सदस्य श्री. अरुण पांडुरंग पाटील यांच्या हस्ते त्यांचा सप्निक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री. काटकर म्हणाले, संस्थेने आणि श्री. पी. डी. पाटील साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जे काम करण्याची संधी दिली त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी आज पर्यंत चांगल्या प्रकारे काम करत राहिलो. या कामामुळे गरीब विद्यार्थ्यांची सेवा करण्याची व त्यांचे भविष्य घडवण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी संस्थेचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. अल्ताफहुसेन मुल्ला हे होते. त्यांनी श्री. काटकर यांच्या कामाची प्रशंसा केली आणि इथून पुढेही संस्थेच्या कामकाजात त्यांनी सहकार्य करावे अशा प्रकारची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य प्रो.डॉ. एस. आर. सरोदे यांनी केले. पाहुण्याची ओळख प्रा.डाॅ.एम. एस. शिंदे यांनी केले. तर प्रा.डाॅ. एन.ए.पाटील, श्री. एम. एस. पाटील, प्रा.एस.एस.बोंगाळे ,प्रा.आर.एस. कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये श्री काटकर यांच्या कामाची प्रशंसा केली .या कार्यक्रमाचे आभार प्रा.पी. एस. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सौ. एस. पी. पाटील यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व सदस्य श्री नंदकुमार बटाणे, माजी प्राचार्य बी.एन.कालेकर मा. प्राचार्य एल. जी. जाधव महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक तसेच काटकर यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.