*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*
म्हसवड : श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड, ता. माण येथे डिजिटल व आर्थिक साक्षरता जनजागृती पत्रिका कार्यक्रम कॉमर्स विभागाच्या वतीने दिमाखात साजरा करण्यात आला.
प्राध्यापिका तांबोळी एन.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमर्स मॉडेल ,पोस्टर प्रेसेंटेशन व डिजिटल व आर्थिक साक्षरता जनजागृती पत्रिका कार्यक्रम विद्यार्थांनी मोठ्या उत्साहात साजरा करून तरुणांमध्ये जनजागृती केली.
यावेळी विद्यार्थांनी जागतिकीकरणाच्या युगात असणाऱ्या विविध घटकांचे प्रात्यक्षिके मॉडेलच्या स्वरूपात तयार केली व महाविद्यालयाच्या प्रदर्शनात मांडली.यामध्ये म्हसवड शहरातील माणदेशी महिला बँक, म्हसवड बाजार समिती, ई-कॉमर्स, बॅलन्स शीट, अकाउंटचे नियम, म्हसवड गावातील असणाऱ्या विविध बँका, एटीएम मशीन, लेवल ऑफ मॅनेजमेंट, अशा अनेक प्रकारचे मॉडेल विद्यार्थ्यांनी आकर्षक बनवलेले होते. यातील महत्त्वाचे आकर्षण मॉडेल हे भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा रेल्वेला असलेल्या विविध डब्यांमधून दर्शवलेला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी म्हसवड गावातील असणाऱ्या विविध बाजारपेठा ,दुकाने यांची जाहिरात कशा पद्धतीने चांगली करता येईल हे विविध तयार केलेल्या भित्तिपत्रकाच्याद्वारे दाखवले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम एस.टी. , पत्रिकेचे प्रायोजक बी.कॉम भाग एक मधील विद्यार्थी प्रथमेश उबाले ,अकाउंटन्सी विभागाच्या प्राध्यापिका तांबोळी एन.बी., डॉ. कुलाल.टी .एस, प्रा. रणवरे डी . जे., प्रा. कुलकर्णी एच एस, सावंत एम .एस, प्रा. कु. प्रज्ञा माने , प्रा. डॉ. सौ. देशमुख एस. व्ही. मॅडम., प्रा. क्षीरसागर व्ही. डी., प्रा .प्रभाकर बनसोडे या प्रमूख मान्यवरा सहित बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉमर्स विभागातील अकाउंटन्सी विभागाच्या प्राध्यापिका तांबोळी एन.बी. यांनी विशेष परिश्रम घेतले.