Home यवतमाळ गावंडे महाविद्यालयात “सीड बॉल्स” कार्यशाळा संपन्न

गावंडे महाविद्यालयात “सीड बॉल्स” कार्यशाळा संपन्न

95

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर ( यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि.२३ फेब्रुवारी) गो. सी. गावंडे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग, ग्रीन आर्मी क्लब व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय सीड बॉल्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. प्रभाकर दिघेवार, दीपक ठाकरे, गजानन रासकर, विष्णू दिघेवार, विजय रावले हे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड मार्फत कार्यशाळेसाठी उपस्थित होते व या सर्वांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना लाभले.

मार्गदर्शकांनी सांगितले की सीड बॉल्स बनवणे सोपे आहे. तथापि, विविध बियांमध्ये किती खत आणि चिकणमाती जोडली जाईल याचा विचार केला पाहिजे.
बर्‍याच वनस्पतींप्रमाणेच, पाच भाग माती ते तीन भाग चिकणमाती हा एक सामान्य नियम चांगला कार्य करतो.

रोपांवर अवलंबून अंकुर येण्याचा कालावधी बदलत असला तरी, “हे बॉम्ब उडवण्यासाठी” वसंत ऋतु आणि उन्हाळा हा सर्वोत्तम कालावधी आहे. माती आणि बियाणे उपलब्ध असलेल्या जगात कोठेही कोणीही गुंतवणूक न करता सीड बॉल बनवू शकतो. सीड बॉल्सचा वापर सीमारेषेने-नुकसान झालेल्या उंच प्रदेशांवर कायमस्वरूपी कुरण तयार करण्यासाठी केला गेला बऱ्याच वर्षांपूर्वी केला गेला होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. माधवराव बा.कदम यांनी संदेश दिला की, ‘निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पी. डी. वंजारे, प्रा. डॉ. के. एस. सोनटक्के, प्रा. डॉ. एस. व्ही. सुर्वे, प्रा. डॉ. व्ही.व्ही. कदम व कु. शितल कांबळे, श्री. रामेश्वर बावस्कर यांनी कार्यशाळेचे आयोजन केले व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सोनटक्के यांनी केले.

अशा प्रकारचे वेगवेगळे शिबिर व कार्यशाळा महाविद्यालयात राबविण्यात येतात व त्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.रामसाहेब देवसरकर व सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन व पाठबळ विद्यार्थ्यांना लाभते असते व त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम महाविद्यालयात नियमितपणे घेतले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here