✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दि.23 फेब्रुवारी) काल मध्य रात्री शहरातील पटेल कॉम्प्लेक्स येथील माकोडे यांच्या जगदंबा झेरॉक्स यांच्या दुकानातील वक्रांगी कंपनी च्या खाजगी ATM मधुन 70 ते 80 हजाराची रोख रक्कम लंपास केली.
चोरट्यानी मशीन चा खालचा भाग कापून त्यातील रक्कम पळवली सकाळी दुकान मालकाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी आदेश दिले.