Home महाराष्ट्र दस्केबर्डी येथे सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न !….

दस्केबर्डी येथे सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न !….

123

 

प्रतिनिधी – पी.डी.पाटील

चाळीसगांव – चाळीसगाव तालुक्यातील दस्केबर्डी या गावी महात्मा जोतीराव फुले निर्मित सत्यशोधक समाज संघाच्या सार्वजनिक सत्यधर्मीय विधीनुसार सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम वधू-वरांच्या हस्ते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सर्जेराव बारकु बोरसे व पोपट बारकू बोरसे यांची पुतणी, सौ.अनिता व भगवान बारकू बोरसे ( दस्केबर्डी ) यांची कन्या पूर्वा आणि संजीव बाबुराव महाजन यांचे पुतणे व सौ.उज्वला व श्रीराम बाबुराव महाजन रा. सोनगड ( गुजरात ) यांचे चिरंजीव यांचा दस्केबर्डी येथे १९ फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून पातोंडे येथील सत्यशोधक विधीकर्ते भगवान शामराव रोकडे यांच्या हस्ते सत्यशोधक पद्धतीने साक्षगंध मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या साक्षगंध कार्यक्रमासाठी सत्यशोधक समाज संघाचे राज्य महासचिव डॉ.सुरेश झाल्टे प्रमुख अतिथी होते तसेच चाळीसगाव तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व आप्तेष्ट- नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या साक्षगंध सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक समाज संघाच्या संदर्भात विस्तृत माहिती सांगून मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात गावोगावी सत्यशोधक पद्धतीने विवाह, साखरपुडा, दशपिंडविधी, गृहप्रवेश व्हावेत असे आवाहन केले. येत्या १० मार्च, २०२४ ला नायगाव येथे सत्यशोधक समाज संघाचे पहिले महिला अधिवेशन पार पडणार आहे या अधिवेशनात महाराष्ट्रातील महिलांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले.
दस्केबर्डी येथील पूर्वा चे वडील भगवान बोरसे सर यांनी यापूर्वीही दस्केबर्डीमध्ये अनेक सत्यशोधक विवाह त्यांच्या हातून झालेले आहेत ते स्वतः सत्यशोधक विधीकर्ते आहेत. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा विचार घरा- घरापर्यंत पोहोचण्याचे काम हे बोरसे कुटुंब करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here