धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ४७५ येथील रहिवाशांनी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा प्रथम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.
शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण कोळी होते. कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक बी एम सैंदाणे, प्रल्हाद विसपुते, गोकुळ महाजन, मैराळे दादा व कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण कोळी यांच्या शुभहस्ते कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक – छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले या सोबतच शिवजयंतीचे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माता-भगिनींच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
यानंतर कॉलनीतील इशिता कोळी, रिशिता बन्सी, तनिष्का सैनी, दिशा कुलट, दृष्टि कुलट, चैताली न्हावी, आराध्या न्हावी या सर्व मुलींनी मासाहेब जिजाऊंची वेशभूषा स्वीकारली व मासाहेब जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्र विषयी मनोगत व्यक्त केले. यानंतर शिवजयंती चे खरे जनक – राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका संकेत पाटील यांनी साकारून आपले मनोगत व्यक्त केले. हर्षल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यानंतर सर्व कॉलनीवासियांनी सुरूची भोजनाचा आनंद घेतला.
याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, भरत पाटील, अनिल कुलट, निलेश कुलट, जगन्नाथ भोई, एस एन कोळी, जे एस पवार, गोकुळ महाजन, बन्सी दादा, अजय मैराळे, पंकज मिस्तरी, जगन्नाथ भोई, रविंद्र शिरसाठ,संजय सुतार,निलेश गुरव, वासुदेव न्हावी, तसेच कृष्ण गीता नगरचे रहिवासी बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार जे एस पवार यांनी मानले.