_श्रीविश्वकर्माजींनी महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वज्र निर्माण केले, अशी मान्यता आहे. या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे. अशी रोचक संकलित माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या सदर लेखात जरूर वाचा… संपादक._
भगवान श्रीविश्वकर्मा पूजा दिवस सामान्यतः कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा आणि त्रिपुरा इत्यादी राज्यांमध्ये दरवर्षी १७ सप्टेंबरच्या ग्रेगोरियन तारखेला साजरा केला जातो. हा उत्सव सहसा कारखाने आणि औद्योगिक भागात सामान्यतः दुकानाच्या मजल्यावर साजरा केला जातो. विश्वकर्मा हा जगाचा निर्माता आणि देवतांचा शिल्पकार मानला जातो. हे हिंदू कॅलेंडरच्या कन्या संक्रांती वर येते. हा सण प्रामुख्याने कारखाने आणि औद्योगिक भागात, अनेकदा दुकानाच्या मजल्यावर साजरा केला जातो. पूजेचा दिवस केवळ अभियंता आणि स्थापत्य समुदायाद्वारेच नव्हे तर कारागीर, यांत्रिकी, वेल्डर यांच्याद्वारे देखील श्रद्धेने चिन्हांकित केला जातो. औद्योगिक कामगार, कारखाना कामगार इ.चांगल्या भविष्यासाठी, सुरक्षित कामाच्या परिस्थितीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या संबंधित क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. विविध मशीन्स सुरळीत चालण्यासाठी कामगार प्रार्थना करतात.
श्रीविश्वकर्मा पूजा दिवस हा हिंदू देव विश्वकर्मा, दैवी शिल्पकार यांच्यासाठी उत्सवाचा दिवस आहे. तो स्वयंभू आणि जगाचा निर्माता मानला जातो. त्याने द्वारका हे पवित्र शहर बांधले जेथे कृष्णाने राज्य केले, पांडवांची मायासभा आणि देवांसाठी अनेक भव्य शस्त्रे तयार केली. त्यांना बिल्डर, अभियंता, शास्त्रज्ञ जगाच्या निर्मात्याला देव म्हणतात. यापैकी पाच शास्त्रज्ञ निर्माते झाले आणि अनेक शास्त्रज्ञ निर्माते झाले. याचा5 उल्लेख ऋग्वेदात आहे आणि त्याचे श्रेय स्टेप्त वेद, यांत्रिकी आणि वास्तुशास्त्राचे विज्ञान आहे. विश्वकर्माच्या विशेष मूर्ती आणि प्रतिमा सामान्यतः प्रत्येक कामाच्या ठिकाणी आणि कारखान्यात स्थापित केल्या जातात. सर्व कामगार एका सामान्य ठिकाणी जमतात आणि पूजा करतात. विश्वकर्मा पूजेच्या तिसऱ्या दिवशी सर्वजण उत्साहात विश्वकर्माजींच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते. शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. देशातील काही ठिकाणी दिवाळीत, तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी भाद्रपद वद्य संक्रांतीला विश्वकर्मा पूजनाची परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. सृष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होता. समस्त प्राणीसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानला गेला आहे. एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते. शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुतलनामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरूड भवन आदींची निर्मिती केली. विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी रामसेतू बांधला. विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली. याशिवाय जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती, लंका, श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती, असे सांगितले जाते.
भारतात १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय श्रम दिवस आणि श्रीविश्वकर्मा जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विश्वकर्मा यांची पूजा केली जाते, स्मरण केले जाते. या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते. कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट अगदी दररोज वापरतो. हीदेखील यंत्रे आणि शस्त्रे आहेत, यांशिवाय आपले पानही हलत नाही. त्यामुळे या यंत्रांचे पूजन करणे लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र-शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते. भाद्रपद वद्य संक्रांतीला असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त घर आणि कारखाना किंवा कार्यालयात वापरली जाणारी अवजारे, शस्त्रे, हत्यारे, यंत्रे यांचे पूजन केले जाते. सर्व अवजारे, शस्त्रे, हत्यारे, यंत्रे यांची स्वच्छता केली जाते. त्याला तेल-पाणी, ग्रीसिंग केले जाते. यानंतर विश्वकर्मा पूजन केले जाते. कार्यालय व कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप केले जाते. उपस्थित सर्वजण एकमेकांना विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतात आणि विश्वकर्मा यांचे मनोभावे स्मरण करतात. ब्रह्मांडातील प्रथम शिल्पकार, वास्तुकार आणि अभियंता म्हणून विश्वकर्मा यांची ख्याती आहे.
श्रीविश्वकर्मा पूजनात कलश, अक्षता, फुले, मिठाई, फळ, सुपारी, धूप, दीप, रक्षासूत्र, दही आणि विश्वकर्मा यांची तसबीर आदी पूजासाहित्य एकत्र केले जाते. यांनतर अष्टदलाची रांगोळी काढली जाते. यानंतर एका चौरंगावर विश्वकर्मा यांची तसबीर स्थापन करण्यात येते. विश्वकर्मा यांची पंचोपचार पूजा होते. यानंतर अक्षता, चंदन, हळद-कुंकू अर्पण केले जाते. ऋतोकालोद्भव फुले, फळे, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करतात. विश्वकर्मा यांचे स्मरण करून त्यानंतर कारखाने, कार्यालयातील सर्व अवजारे, हत्यारे, शस्त्रे, यंत्रे यांचे पूजन केले जाते. या सर्वांना गंधाक्षता अर्पण केले जातात. यावेळी ॐ पृथिव्यै नमः। ॐ अनंतम नमः।। ॐ कूमयि नमः। ॐ श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः।। असे मंत्र म्हणून कलशातील पाणी अवजारे, शस्त्रे, यंत्रे यांच्यावर शिंपडले जाते. यानंतर सर्व उपस्थित मंडळी विश्वकर्मांची आरती करतात आणि प्रसादाचे वाटप करण्यात येते. भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये विश्वकर्मा पूजनाला विशेष महत्त्व आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या अवजार, शस्त्रे, यंत्र, हत्यारे यांच्या पूजनालाही महत्त्व आहे. या माध्यमातून त्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. आपल्यासाठी झटणाऱ्या अगदी निर्जीव गोष्टींचाही आपण मान राखला पाहिजे, असा महत्त्वाचा संस्कार यामधून होतो, असे सांगितले जाते. तसेच या पूजनामुळे यंत्रे, शस्त्रे, हत्यारे, अवजारे आपला विश्वासघात करत नाहीत. कोणत्याही प्रसंगात आपली साथ कायम ठेवतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार, ब्रह्म देवाचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तूदेव आहे. वास्तूदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे, धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर, महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार ब्रह्म देवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली.
श्रीविश्वकर्माजींनी महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वज्र निर्माण केले, अशी मान्यता आहे. या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे.
!! जयंतीच्या पावन पर्वावर श्री विश्वकर्माजींच्या पावन चरणी विनम्र अभिवादन !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.