Home महाराष्ट्र हुरड्या विना आणि भलकरी शिवाय ज्वारीची सुगीला सुरवात गरीबाची भाकर महागणार

हुरड्या विना आणि भलकरी शिवाय ज्वारीची सुगीला सुरवात गरीबाची भाकर महागणार

138

 

सातारा, खटाव, प्रतिनिधी/ नितीन राजे 9822800812

हुरड्याला आलेले कनिस पाण्याअभावी भरले नाही
पावसाअभावी उगवण क्षमता कमी झाल्याने दुबार पेरणी करावी लागली पेरणी खर्च वाढला
दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचाच ज्वारी पिकाकडे कल जनावरांचा खाद्याचा वार्षिक खर्च वाचतो
जीहे कटापूर उपसा सिंचन योजनेचा हातभार लागला
शेतीप्रधान भारत देशात सातारा जिल्ह्यातील खटाव मान तालुक्याला पावसाच्या जीवावरच्या शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे
जून महिन्यातील पाऊस काळ झाला नसल्याने खरीप हंगाम तर वाया गेलाच यामध्ये नगदी पिकांचे जास्त समावेश असतो रब्बी मध्ये ज्वारी हरभरा ही मुख्य पिके घेतली जातात उसाचे क्षेत्र वाढल्याने ज्वारी चे उत्पादन कमी होत असले तरी दुग्धोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल असल्यामुळे ज्यांच्याकडे जनावरे आहेत ते ज्वारी पीक घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नसतो .कारण वर्षाचा खाद्याचा खर्च जनावरांचा त्यावर अवलंबून असल्याने ज्वारी पिकाकडे लक्ष द्यावे लागते.
खरीप हंगामात पावसा व्हावी झाला नसल्याने रब्बीच्या ज्वारीची दोन ते तीन वेळा पेरण्या करून देखील काही लोकांच्या द्वारे उगवल्या नाहीत त्यामुळे ज्वारी उत्पादनात घट होणार तर आहेच परंतु आलेल्या ज्वारी बहरात असतानाच पाण्याची गरज होती मात्र पाणी न मिळाल्याने बहुतांश ज्वारी या फक्त जनावरांच्या खाण्या साठीच योग्य राहतील व अन्य ज्वारी चे उत्पादनात घट होणार त्यामुळे आता हुरड्याशिवाय आणि रात्रीच्या टपोऱ्या चांगल्यातील जेवणावर ताव मारून भलकरीच्या तालावर ज्वारी उपटण्याच्या कामांच्या आता दंतकथा होतील. आता गरीबाची भाकर महागणार यात शंकाच नाही.
एकरी ज्वारी काढण्यासाठी सहा ते सात हजार रुपये मजूर घेतात ज्वारी काढल्यानंतर कसे काढण्यासाठी अडीचशे रुपये प्रति महिलेला कनिस काढण्यासाठी द्यावे लागतात त्यांची मेहनत देखील तशी असती प्रत्येक ज्वारीचे ताट न ताट बघून त्याचं कधीच काढावं लागतं एका ते जरी कणीस राहिले तरी त्याला उंदीर लागून संपूर्ण गंज खराब होऊ शकते. (गंज याचा अर्थ कडबा एकत्र करून लावण्याची विशिष्ट पद्धत) ठिकाण म्हणजे गंज .कनिस काढल्यानंतर कडबा एकत्र करून तो एका ठिकाणी बांधायचे असल्यास दोनशे रुपये शेकडा, तर दोन ठिकाणी बांधण्यासाठी तीनशे रुपये शेकडा असा दर चाललेला आहे. एकंदरीत हिशोब करता शेतकऱ्यांना ज्वारीचे पिके विकत घेण्यापेक्षा महाग पडते.
जीहे कटापुर सचिन योजनेचा लाभ
जे कटापूर सिंचन योजने च्या माध्यमातून नेर तलावात पाणी सोडून ते येरळा नदीत व नेर कालव्यांमार्फत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्याने बहुतांशी शेतकरी समाधान वातावरण आहे . त्यामुळे इथून पुढच्या काळात पावसावरील शेती करण्याचे दिवस खटा मान तालुक्यातील जनतेवर येणार नाहीत अशी आशा पल्लवीत झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here