Home यवतमाळ उमरखेड येथे ढोल ताशाच्या गजरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा (भीम टायगर सेने...

उमरखेड येथे ढोल ताशाच्या गजरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा (भीम टायगर सेने कडून महाराजांना पुष्पहार अर्पण अभिवादन)

213

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
मो.9823995466

उमरखेड (दि.20 फेब्रुवारी) शहरामध्ये हिंदवी स्वराज्याचे जनक शिव छत्रपती शिवजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली आहे.

उमरखेड शहरामध्ये शिवजी महाराज छत्रपती चौकामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो रायगड किल्याचे हुबेहूब केलेले चित्रीकरण केले होते.

भीम टायगर सेना तथा “संविधान बचाव परिषद” आयोजन समिती चे आयोजक शाम धुळे, सिद्धार्थ दिवेकर, कैलास कदम, संदीप विणकरे, सुभाष बरडे, मोसिन पठाण यांच्या कडून छ. शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण शिव जयंती निमित्ताने अभिवादन केले.

शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथुंन मोटर सायकल रॅली काढण्यात आली होती.
या रॅली मध्ये सर्व युवा शिव भक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता. यानंतर वेगवेगळ्या शाळेतील विध्यार्थी आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
लेझिम, ढोल तसेच्या वाद्यनी शिवछत्रपती चौक दुमदुमला होता.
यावेळी सर्व उमरखेड मधील भीम टायगर सेना इत्यादी अनेक सामाजिक संघटनांनी आपला सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here